(फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या या जगात अनेकजण लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडतात. यावर फार वाद सुरु असला तरी तरुणांमध्ये हे फार लोकप्रिय ठरत चालले आहे. यात मुलगा मुलगा लग्नाआधीच एकत्र राहतात. यामुळे ते मानसिक आणि शारीरिकरित्या ते दोघे जोडले जातात आणि एकमेकांना समजून घेणे सोपे होते. लग्न हा निर्णय फार महत्त्वाचा असतो. एकदा का आपण या नात्यात गुंतलो की मग ते टिकवून ठेवणे आपली जबाबदारी बनते. बऱ्याचदा आपण आपल्या पार्टनरला नीट समजून न घेता लग्न केले की मग नंतर खटके उडू लागतात आणि मग नात्यात दुरावा येतो. यामुळेच लोक लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडू पाहतात.
आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाविषयी माहिती सांगत आहोत जिथे लग्नाआधी संबंध ठेवणे सामान्य गोष्ट आहे. जुन्या काळापासून लोक ही परंपरा पळत आहे, यात स्वतः कुटुंबीय आपल्या मुलींना याची परवानगी देतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नक्की हे ठिकाण कुठे आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, कंबोडियातील कुन गावात ही प्रथा पाळली जाते. इथे आजही मुलींना हवा तसा जोडीदार निवडण्यासाठी तरूण मुलींना साधारण 10 तरूणांसोबत संबंध ठेवण्याची परवानगी घरातील लोकांकडूनच मिळते. इथे तरूणी वेगवेगळ्या पद्धतीनं तरूणांसोबत रात्र घालवतात. त्यांच्यासोबत वेळ घालवतात. यादरम्यान त्यांना वाटलं तर त्यांच्यासोबत संबंध ठेवतात. आश्चर्याची बाब म्हणजे तरूणी ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करतात ते घर मुलीच्या वडिलांकडूनच बांधलेलं असतं.
संबध ठेवण्यासाठी वडील तयार करतात झोपडी
सामान्यपणे आपल्या देशात एक वडील आपल्या मुलीसाठी मुलगा शोधतात. पण कंबोडियाच्या कुन गावात फारच वेगळी प्रथा आहे. इथे वडील आपल्या मुलीसाठी एक ‘लव्ह हट’ नावाची झोपडी किंवा रूम तयार करतात. या ‘लव्ह हट’मध्ये तरुणी त्यांच्या मित्रांसोबत संबंध ठेवतात. लव्ह हटमध्ये तरुणी केवळ रात्रीच राहतात. जोपर्यंत त्यांचा साखरपुडा होत नाही तोपर्यंत ते दिवसा सोबत राहू शकत नाहीत. कंबोडियातील कुन गावात ही परंपरा खूप वर्षांपासून चालत आली आहे. यादरम्यान तरूणी साधारण 8-10 वेगवेगळ्या तरूणांना आमंत्रित करते, त्यांना भेटते आणि त्यांच्यासोबत संबंध ठेवते. त्यानंतर त्यातील कुणाशी लग्न करायचं हे ती ठरवते. या गावात राहणाऱ्या केउंग जमातीच्या लोकांचं मत आहे की, याप्रकारची प्रथा पाळून ते त्यांच्या समाजातील आणि परिवारातील महिलांना सशक्त बनवतात. इथे स्वतः वडील मुलींसाठी दुसऱ्या पुरूषांसोबत संबंध ठेवण्यासाठी झोपडी तयार करून देतात. येथील लोकांची अशीही मान्यता आहे की, अशाप्रकारे तरूणी त्यांच्यासाठी परफेक्ट पतीची निवड करू शकतात.






