उसाचा रस थेट सातासमुद्रापार पोहोचला; एका ग्लासची किंमत ऐकून व्हाल थक्क, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, दोन युरोपीन लोक रस्त्यावर उसाचा स्टॉल लावला आहे. भारतीय स्टाईलमध्ये उसाचा रस काढून विकत आहे. ग्राहकांची गर्दी देखील जमा झाली आहे. विशेष म्हणजे या लोकांनी उसाच्या रसाला कॉकटेल स्टाईलमध्ये बनवून विकले आहे. यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याची किंमतही तेवढीच जास्त आहे. ही बाब आश्चर्याची आहे. एका ग्लासची किंमत ५ युरो आहे जी भारतीय रुपयांमध्ये ५०० रुपयांच्या आसपास आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. भारतीयांना तर किंमत ऐकून धक्काच बसला आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @prabhuvisha या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेक भारतीय हा व्हिडिओ पाहून चकित झाले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, अरे यार, याचं तर खरंच जबरदस्त ‘अपग्रेड’ झालंय. तर दुसऱ्या एकाने भाई वा, काय आयडिया आहे असे म्हटले आहे. काहींनी हे काही नवीन नाही, अनेक वर्षांपासून सुरु आहे हे असे म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






