Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indigo Crisis : एकीच्या हातात पतीच्या मृत्यूचं कफिन तर दुसरीच्या हातात वडिलांच्या अस्थी… मन हेलवणारी दृश्ये अन् Video Viral

Indigo Flight Cancelled : इंडिगोच्या गोंधळामुळे अंत्यसंस्कारही रखडले... एअरपोर्टवर दिसून आले भीषण दृश्य. घटनेचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असताना दोन व्हिडिओजने मात्र सर्वांच काळीज पिळवटून टाकलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 07, 2025 | 08:58 AM
Indigo Crisis : एकीच्या हातात पतीच्या मृत्यूचं कफिन तर दुसरीच्या हातात वडिलांच्या अस्थी... मन हेलवणारी दृश्ये अन् Video Viral

Indigo Crisis : एकीच्या हातात पतीच्या मृत्यूचं कफिन तर दुसरीच्या हातात वडिलांच्या अस्थी... मन हेलवणारी दृश्ये अन् Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • इंडिगोने आपल्या शेकडो फ्लाईट्स अचानक कॅन्सल केल्या
  • एअरपोर्टवर अडकलेल्या प्रवाशांचे हाल अधिकाधिक बिघडताना दिसून आले
  • महिलेच्या पतीचे कफीन तर मुलीच्या वडिलांच्या अस्थिही एअरपोर्टवरच अडकल्या
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने आपल्या अनेक फ्लाईट्स कॅन्सल केल्यानंतर अनेक प्रवासी एअरपोर्टवरच अडकल्याचे दिसून आले. याचा सर्वात मोठा फटका हा प्रवाशांना बसल्याचे समोर आले. यामुळे कुणाचा जॉब गेला तर कुणाला स्वतःच्याच रिसेप्शन पार्टीमध्ये जाता नाही आलं तर काहींना स्वतःच्या देशात परतता आलं नाही. एअरपोर्टवर अडकलेल्या या प्रवाशांचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात प्रवासी प्रचंड त्रासलेले आणि संतापजनक दिसून येत आहेत. सध्या हा मुद्दा देशात मोठे रूप घेत असून आणखी दोन हृदयद्रावक आणि मनाला हेलावून टाकणारे व्हिडिओज इंटरनेटवर शेअर करण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये दोन प्रवासी शवपेटी आणि अस्थि घेऊन एअरपोर्टवर अडकल्याचे दिसून आले. त्यांना वेळेत आपल्या प्रियजनांचे अंत्यसंस्कार करायचे होते पण इंडिगोच्या गोंधळामुळे तेही एअरपोर्टवर अडकून राहिले.

Indigo Crisis : इंडिगोच्या गोंधळला कंटाळली आफ्रिकन महिला, काऊंटरवर चढत मुंबई एअरपोर्टवर घातला राडा; Video Viral

पतीचे कफीन घेऊन महिला अडकली एअरपोर्टवर…

इंडिगोच्या संकटामुळे एका महिलेवर दुःखाचा डबल डोंगर कोसळताना दिसून आला. महिला शिलाँगवरून आपल्या पतीच्या मृत्यूची शवपेटी कोलकात्याला घेऊन जात होती पण वाटेतच तीही या गोंधळाला बळी पडली. आपले दुःख व्यक्त करताना महिलेने सांगितले की, “मी आज सकाळी शिलाँगहून आली. माझ्या पतीचे निधन झाले आणि मी त्यांचे शवपेटी कोलकात्याला घेऊन जाण्यासाठी आलो आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या गावी दफन करता येईल. आम्ही इंडिगोची फ्लाइट बुक केली आहे आणि अजूनही फ्लाइट टेक ऑफ होईल की नाही याबद्दल कोणतीही माहिती नाही…”आसाममधील गुवाहाटी विमानतळावर अडकलेल्या एका पत्नीची ही व्यथा मनाला भिडणारी आहे. ती विचारत आहे, “या परिस्थितीत मी काय करावे?” पण याचे उत्तर अद्याप कुणाकडेही नाही.

वडिलांच्या अस्थि वाहू शकली नाही मुलगी…

आणखी एक अशीच घटना लोकांच्या मनाला भिडली ज्यात मुलगी वडिलांच्या अस्थि हातात घेऊन एअरपोर्टवर अडकल्याचे समजले. हातात एक कलश धरून आणि माध्यमांना दाखवत नमिता म्हणाली, “माझ्या वडिलांच्या अस्थी माझ्याकडे आहेत. मला बंगळुरूहून दिल्लीला जायचे व . दिल्लीहून मला हरिद्वारला पोहोचण्यासाठी डेहराडूनला विमान पकडावे लागेल. अस्थींचे विसर्जन उद्या आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता, इंडिगोने विमान रद्द केले. आता ते म्हणत आहेत की त्यांच्याकडे आज कोणतेही विमान नाही. ते आम्हाला इतर विमान कंपन्यांकडून विमान बुक करण्यास सांगत आहेत. इतर विमानांचे तिकिट भाडे प्रति व्यक्ती ६०,००० रुपये आहे, जे मला परवडत नाही… आम्ही हरिद्वारला पोहोचू शकत नाही. आमचे सर्व पैसे वाया गेले आहेत. आम्हाला एका आठवड्यात एक छोटासा परतावा मिळेल. किती कपात होईल हे आम्हाला माहित नाही.” नमिता यांनी सरकारला आवाहनही केले की, “मी सरकारला विनंती करते की मला हरिद्वारला पोहोचण्याची व्यवस्था करावी कारण माझ्या वडिलांच्या अस्थी गंगेत विसर्जन करणे खूप महत्वाचे आहे.”

13 वर्षांच्या शोधानंतर अखेर सापडलं… जगातील सर्वात दुर्मिळ ‘मृतदेहाचे फुल’; Viral Video ने सर्वांनाच केलं चकित

इंडिगोच्या फ्लाइट रद्द झाल्यामुळे एअरपोर्टवर माजवलेला हा गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले. या लेखात आम्ही दोन कथा सांगितल्या पण इंटरनेटवर घटनेचे व्हायरल होणारे अनेक व्हिडिओज लोकांच्या दुःखाची कथा व्यक्त करते.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indigo flight cancelled one woman holds her husbands coffin and the other girl holds her fathers ashes heartbreaking video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 08:56 AM

Topics:  

  • IndiGo
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आधी बाचाबाची, मग थेट हाणामारी! दिल्ली मेट्रोत महिलांचा तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्…, VIDEO VIRAL
1

आधी बाचाबाची, मग थेट हाणामारी! दिल्ली मेट्रोत महिलांचा तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्…, VIDEO VIRAL

ना पोलिसांचा धाक, ना मरणाची भिती! रहदारीच्या रस्त्यावर बाईक पळवत तरुणांची स्टंटबाजी, VIDEO पाहून येईल संताप
2

ना पोलिसांचा धाक, ना मरणाची भिती! रहदारीच्या रस्त्यावर बाईक पळवत तरुणांची स्टंटबाजी, VIDEO पाहून येईल संताप

अबब! काका बनले हत्तीचा सोफासेट, धावत आला अन् पाठीवरच जाऊन बसला… दृश्य पाहाल तर हसू आवरणार नाही; Video Viral
3

अबब! काका बनले हत्तीचा सोफासेट, धावत आला अन् पाठीवरच जाऊन बसला… दृश्य पाहाल तर हसू आवरणार नाही; Video Viral

स्टंटबाजी नडली! बाईक हवेत उचलून स्टंट करायला गेला अन् थेट जमिनीवर आदळला, एका झटक्यात हिरोगिरी बाहेर , VIDEO VIRAL
4

स्टंटबाजी नडली! बाईक हवेत उचलून स्टंट करायला गेला अन् थेट जमिनीवर आदळला, एका झटक्यात हिरोगिरी बाहेर , VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.