Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानात गोंधळ! तासन्‌तास एसी बंद, उकाड्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट; Video Viral

Indigo Flight Crisis : दिल्ली विमानतळावरुन रांचीला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने टेकऑफआधीच रनवेवर विमानाला अनेक तास थांबवण्यात आले. या दरम्यान विमानातील एसीही खराब झाला ज्यामुळे उष्णतेत प्रवाशांतचे हाल बेहाल झाले. विमानातील गोंधळाचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल झालाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 28, 2026 | 01:04 PM
दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानात गोंधळ! तासन्‌तास एसी बंद, उकाड्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट; Video Viral

दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानात गोंधळ! तासन्‌तास एसी बंद, उकाड्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • उड्डाणापूर्वी झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.
  • गैरसोयीमुळे विमानातील वातावरण तणावपूर्ण बनले आणि प्रवाशांमध्ये नाराजी पसरली.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कौस्तुभ खातू : इंडिगो एअरलाईन सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असते. ही भाराताची सर्वात लोकप्रिय एअरलाईन असली तरी सोशल मिडियावर कंपनी नेहमीच वादाच्या कचाड्यात सापडते. सोशल मिडियावर इंडियोगोच्या विमानातील अनेक घटना शेअर होत असतात ज्यात प्रवाशांच्या गैरसोयीचे वाईट दृष्य नेहमीच नजरेल पडते. आताही इंटरनेटवर एक असाच व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात विमानतळावरच प्रवाशांचा संताप ओसंडून वाहताना दिसून आला. ही घटना दिल्लीतून रांची येथे जाणाऱ्या इंडिगोच्या (6E-2614) फ्लाइटमध्ये आहे. फ्लाईट टेक ऑफ होण्याआधीच काही तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी दोन ते तीन तास विमानात अडकून राहिले. यावेळा एसीही चालत नसल्याने उष्णतेने प्रवासी हैराण झाले आणि फ्लाईटमध्ये एकच गोंधळ सुरु झाला.

संतापजनक! कामाख्या मंदिरात जमावाचा कपलवर हल्ला, तरुणीला फेकून मारली बाॅटल… Viral Video पाहून नेटकरी संतापले

एसी बंद झाल्याने प्रवासी भडकले

मिळालेल्या माहितीनुसार, ही फ्लाईट २.४० वाजता उड्डाण भरणार होती पण टेकऑफआधीच काही तांत्रिक बिघाड झाल्याने रनवेवरच विमानाला अनेक तास थांबवून ठेवण्यात आले. विमान थांबले पण प्रवाशांना मात्र यातून बाहेर सोडले नाही ज्यामुळे सर्व प्रवासी विमानातच अडकून राहिले. यादरम्यानच विमानाचा एसीदेखील अचानक बिघडला ज्यामुळे विमानाच्या आत उकाड्याने प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला. दिल्लीच्या दमट आणि भाजून काढणाऱ्या उन्हात, एसीशिवाय विमानाची केबिन भट्टीसारखी गरम झाली. विमानात असलेली लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि महिलांची अवस्था बिकट झाली. हवेसाठी प्रवाशांना विमानात ठेवलेल्या मासिकांचा वापर करावा लागला. या सर्वच प्रकारामुळे प्रवासी त्रस्त झाले आणि विमानाच्या आत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी सांगितले की, त्यांना विमानाच्या आत श्वास घेणं देखील कठीण झालं होतं, लहान मुले रडत होती परंतु विमानातील स्टाफ त्यांनी विमानाबाहेर जाऊ देत नव्हता.

कल दिल्ली से रांची जा रही इंडिगो फ्लाइट 6E-2614 में यात्रियों का आरोप है उन्हें करीब एक घंटे तक बिना एसी के विमान में बैठाए रखा बंद केबिन में बुजुर्ग और बच्चे गर्मी से बेहाल हो गए,विमान में ठंडक और हवा न होने से लोगों का दम घुटने लगा। pic.twitter.com/cnpHHEHffB — Naseem Ahmad (@NaseemNdtv) June 27, 2026

वय फक्त एक नंबर! ८० वर्षांच्या हरियाणवी आजोबांनी १८०० फूट उंच आकाशात फडकवला भारताचा तिरंगा; Video Viral

प्रवाशांनी क्रू-मेंबर्ससोबत केले भांडण

बऱ्याच काळात जेव्हा काहीच मदत मिळाली नाही तेव्हा प्रवासी रागाने भडकले आणि त्यांनी आपला सर्व राग क्रू-मेंबर्सवर काढायला सुरुवात केली. संतप्त प्रवाशांनी विमानात गोंधळ आणि आंदोलन सुरू केले. विमानात बिघाड होताच त्यांना टर्मिनलवर परत का पाठवण्यात आलं नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रवाशांचा आक्रोश पाहता अखेर काही तासाने विमानाने दरवाजे खुली केली आणि बसच्या मदतनीने सर्व प्रवाशांना टर्मिनलर परत पाठवण्यात आले. तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीनंतर आणि तपासणीनंतर विमानाने काही तासांनंतर उड्डाण भरले. हे विमान संध्याकाळी ४.३५ वाजता रांचीला पोहचणार होते पण या सर्व गोंधळामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे ते ८.१५ वाजता रांचीत पोहोचले.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indigo flight chaos at delhi airport after technical issue passengers protest video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • IndiGo
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral
1

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव
2

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral
3

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral
4

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.