(फोटो सौजन्य: Instagram)
आजोबा म्हणाले – भीती कोणाला वाटतेय?
मिळालेल्या माहितीनुसार, आजोबांचा नातू अंकित त्यांना ऑस्ट्रेलियाला घेऊन गेला होता. इथे त्यांनी १८ हजार फूट उंचावर आकाशात स्कायडाव्हिंगची मजा लुटली. ही मजा लुटताना आजोबांचा एक व्हिडिओ देखील शूट करण्यात आला ज्यात ते आकाशात स्कायडायव्हिंगचा आनंद लुटताना दिसले. व्हिडिओमध्ये नातू आजोबांना एक प्रश्नही विचारताना दिसतो ज्यावर आजोबा म्हणतात की, “भीती कोणाला वाटतेय”. यानंतर ते ‘जय हिंद, जय भारत, जय हरियाणा’ अशी घोषणा करत हवेत उडी मारतात. उंच आकाशात झेप घेतल्यानंतरही आजोबा घाबरत नाही तर ते आनंदाने या क्षणांना आपल्या मनात साठवून ठेवतात. पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर उतरल्यानंतर ते म्हणतात की, “आता पुन्हा आयुष्य सुरू झाल्यासारखं वाटतंय”. यावर त्यांचा नातू अंकित देखील खुश होतो आणि आपल्या आजोबांना एक घट्ट मिठी मारतो.
View this post on Instagram
सोशल मिडियावर आजोबांचा हा स्टंट आता चांगलाच व्हायरल होत असून वय फक्त एक नंबर आहे अशा प्रतिक्रिया लोक व्हिडिओला देत आहेत. हा व्हिडिओ @ankitranabigmouth नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ऑस्ट्रेलियामध्ये १८,००० फूट उंचीवरून आजोबांची स्कायडायव्हिंग’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत आजोबांच्या या साहसावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “आजोबांनी कमालच केली, असा नातू सर्वांना मिळो”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजोबांनी फुल मजा लुटलीये” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अरे भावा… कितीतरी दिवसांत मी पाहिलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे.”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






