
iPhone 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
भारतामध्ये आयफोनची क्रेझ किती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. नवीन आयफोन लॉन्च झाला की Apple Store बाहेर लोकांची गर्दी, रांगा हे आपण दरवर्षी पाहतो. यावर्षी पण तेच झालंय. iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लॉन्च होताच लोक वेडे झाले आहेत. पण यावेळी आयफोन त्याच्या फीचर्सपेक्षा त्याच्या किमतीमुळे जास्त चर्चेत आहे. किंमत ऐकूनच सामान्य माणसाच्या पायाखालची जमीन सरकतेय.
iPhone 18 Pro ची सुरुवातच 1 लाख 64 हजारापासून होते आणि Pro Max ची किंमत तर थेट 4 लाखापर्यंत जाते. म्हणजे एका छोट्या गाडीची किंमत. त्यामुळे सामान्य माणूस कर्ज घेतल्याशिवाय हा फोन घेऊच शकत नाही. आणि याच गोष्टीवरून सोशल मीडियावर एकापेक्षा एक भारी मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून हसून हसून पोट दुखेल. iPhone 18 Pro Price in India:
ज्या लोकांनी नवीन आयफोन घ्यायचा प्लॅन केला होता, त्यांच्यासाठी हा मीम आहे. आधी वाटलं होतं 1 लाख असेल, पण दीड लाखाची किंमत पाहून अनेकांनी आपला प्लॅनच कॅन्सल केला. फोन घेण्याआधीच बँक बॅलन्स चेक करावा लागतोय.
एक मीम खूप व्हायरल होतोय. त्यात लिहिलंय की आई बाबा अजून घरात राहू देत आहेत हेच नशीब समजा. जर तुम्ही दीड लाखाचा फोन मागितला तर घरच्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलं तरी नवल नाही. खास करून कॉलेजच्या मुलांची हीच अवस्था आहे. आयफोन मागायचा कसा हाच प्रश्न आहे.
iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP …
iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना …