
हिजाब न घातल्याची मोठी किंमत? स्लिवलेस ड्रेसमध्ये परफॉर्मन्स करणाऱ्या इराणी गायिकेला दिली ७४ फटक्यांची शिक्षा; Video Viral
लाईव्ह काॅन्सर्टमध्ये स्लिव्हलेस घालण्यावरुन वाद
परस्तू अहमदीने डिसेंबर २०२४ साली यूट्यूबवर एक लाईव्ह काॅन्सर्ट सादर केले होते. यात तिने देशभक्तीपर गीत ‘अज खूने जवानाने वतन’ गायले होते. या परफाॅर्मन्स दरम्यान तिने हिजाब न घालता एक स्लीवलेस ड्रेस परिधान केला होता. तिचा हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला आणि लाखो लोकांचे व्यूज व्हिडिओला मिळाले. वेळी परस्तू अहमदी आणि तिच्या काही सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते, परंतु नंतर त्यांची सुटका करण्यात आली. तथापि, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
घटना दर्शवते की इराणमध्ये बदल नाही
युरोन्यूजच्या वृत्तानुसार, मानवाधिकार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, परस्तू अहमदीला दिलेली शिक्षा हे दर्शवते की इराणमध्ये अजूनही स्थिती काही बदललेली नाही. अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर ह्यूमन राइट्स इन इराण’ चे डायरेक्टर बहार गंदेहारीने सांगितले की, “अहमदीला ७४ फटक्यांची शिक्षा ही एक आठवण करून देते की, इराण सरकार युद्धादरम्यान आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रचाराचा वापर करत असले तरी, इराणमधील मानवाधिकार परिस्थितीत अजिबात बदल झालेला नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, सरकारद्वारे चालवणाऱ्या जाहिराती आणि कलाकरांवरील खटले पाहता सरकार आणि त्यांच्या दाव्यांमध्ये किती तफावत आहे यातील मोठे अंतर पाहता येते.
One day after the U.S. signed a deal with the Islamic Republic، the regime in Iran, handed Parastoo Ahmadi 74 lashes for singing on YouTube. They call America the Great Satan. And then they flew to the table and signed a deal with the «Devil«. But a woman’s voice scared them… pic.twitter.com/FMJdKD7EGZ — Masih Alinejad 🏳️ (@AlinejadMasih) June 18, 2026
ये कोई आम महिला नहीं ईरान की मशहूर सिंगर
परस्तू अहमदी हैं, 29 साल की परस्तू अहमदी को बिना हिजाब गाना गाने के लिए ईरान की अदालत ने 74 कोड़ों की सजा दी है साथ में उनके 8 साथियों को भी 74-74 कोड़ों की सजा मिली है, यहां तक कि परस्तू अहमदी की गायिकी पर बैन और देश छोड़ने पर रोक लगा… pic.twitter.com/kzGY3sTL5h — Saba Khan (@sabakhan21051) June 23, 2026
तामिळनाडूच्या आकाशात दिसले चक्रिवादळाचे भीषण दृष्य, पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; Video Viral
या घटनेचे दोन व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये गायिका स्लिव्हलेस ड्रेसमध्ये गाण गाताना दिसते तर दुसऱ्या व्हिडिओत तिला पट्टयाने चोप दिला जात असल्याचे दिसते. अनेक यूजर्सने या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “धर्मसुद्धा या लोकांना पशूंपासून माणसात बदलू शकला नाही!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इराणचे लोक खूप क्रूर आहेत” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यांचा स्त्रियांना मनापासून तिरस्कार वाटतो”.