Rescuers save dog from building in Tel Aviv, video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. युद्धांतील दृश्यांचे तर अनेक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. सध्या मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु आहे. परंतु या युद्धामुळे लोकांचे भयंकर नुकसान होत आहे. युद्धामुळे केवळ विनाश होतो. या युद्धाचा परिणाम केवळ माणसांचा भोगावा लागत नाहीत, तर निसर्गातील पशू-पक्षी, झाडे यांच्यावरही होती. सध्या याच युद्धातील एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक श्वान तेल अवीव वरील हल्ल्यात जमिनीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला होता. यातून त्याची सुटका करण्यात आली परंतु त्या मुक्या प्राण्याच्या डोळ्यात भीती दिसून येत आहे. हा हृदय पिळटवून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इस्रायलने शुक्रवारी केलेल्या इराणवरील हल्ल्यानंतर हमासने प्रत्युत्तरात्मक कारलाईत इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला.यावेळी इस्रायलच्या तेल अवीवच्या किरया भागात इस्रायलच्या लष्करी मुख्यालयाला आणि संरक्षण मंत्रालयाला लक्ष्य करण्यात आले. शुक्रवारी (१३ जून) रात्री आणि शनिवारी (१४ जून) रात्रभर हे हल्ले सुरु होते. जेरुसेलम आणि तेल अवीवच्या शहरांवर हे हल्ले करण्यात आले. यामध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाला, तर डझनभर लोक जखमी झाले. दरम्यान या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक श्वान हल्ल्यांच्या कचाट्याच सापडला आहे. त्याची यातून सुटका करण्यात आली आहे.
टाईम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, तेल अवीवमध्ये रहिवासी इमारतींवर हल्ला करण्यात आला होता. यावेळी एक इमारत पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. यामध्ये एका श्वान इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकला होता. त्याला बचाव पथकाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. परंतु श्वान प्रचंड घाबरलेला होता. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की, मागे हल्ल्यांचे, स्फोटांचे प्रचंड आवाज येत आहे. यामुळे श्वान आवाजाने थरथर कापत आहे. त्याच्या डोळ्यांमध्ये भीती दिसून येते आहे. त्याच्या मालकाने त्याला मिठी मारली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
כוחות ההצלה חילצו כלבה מתוך הבניין שנפגע בתל אביב pic.twitter.com/zLaLEzKA9G
— Bar Peleg (@bar_peleg) June 13, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @bar_peleg या अकाउंटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांना राग अनावर झाला आहे. या युद्धामुळे अनेक मुक्या प्राण्यांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांनी आपली हळहळ व्यक्त केली आहे. माणसाच्या क्रूरतेमुळे मुक्या जनावरांचे हाल होत आहे. यामुळे अनेकांनी इराण आणि इस्रायल युद्धाचा निषेध केला आहे. युद्ध थांबवण्याचीही मागणी केली जात आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.