'एक नंबर तुझी कंबर...', मराठी गाण्यावर परदेशी चिमुकल्यांचा भन्नाट डान्स ; VIDEO नेटकऱ्यांच्या पसंतीस (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News Marathi: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. तसेच डान्सचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकताना दिसतात. कधी रस्त्यावर डान्स करताना, तर कधी मेट्रोमध्ये, तर कधी उंच झाडाच्या शेंड्यावर चढून लोक डान्स करत असतात. त्यात काही गाणी खूप ट्रेंड होतात. अशा गाण्यांवर सेलिब्रिंटींपासून ते सामान्यांपर्यंत सर्वच व्हिडिओ बनवतात. गेल्या काही काळात गुलाबी साडी, प्रिटी लिटस बेबी, अशी अनेक गाणी सोशल मीडियावर ट्रेंड झाली आहे. या गाण्यांवर केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोकही व्हिडिओ बनवतात.
सध्या असेच एक मराठी गाणे एक नंबर तुझी कंबर सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. यावर अनेकांनी व्हिडिओ बनवल्या आहेत. यामध्ये कलाकारांपासून, सामान्य नागरिकांपर्यंत, तर भारतायांपासून विदेशींपर्यंत लोक व्हिडिओ बनवताना दिसत आहे. शिवाय लहान मुले देखील हा ट्रेंड फॉलो करत आहेत. एक नंबर तुझी कंबर या गाण्यावर एक परदेशी चिमुकल्यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या भन्नाट अशा मराठी गाण्यावर काही परदेशी मुला-मुलींनी डान्स केला आहे. या लहान मुलांनी अगदी भन्नाट अशा एक्सप्रेशनसह, तालात डान्स केला आहे. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @masakakidsafricana या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. या चिमुकल्यांनी गाण्याचे बोल देखील एकदम भन्नाट पकडले आहे. त्यांना पाहून ते विदेशी असल्यासारखे वाटतच नाही असे अनेकांनी म्हटले आहे. अनेकांनी या चिमुकल्यांचे कौतुक केले आहेत. हे तर आपलेच आहेत असे एका युजरने कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एकाने सर्वांनी भारी डान्स केला आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपली मराठी गाणी आता ही केवळ महाराष्ट्रापर्यंतच राहिलेली नाहीत, तर विदेशी लोकांच्या पसंतीस देखील पडत आहेत. अनेक लोकप्रिय गाण्यांवर विदेशी लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.