कडाक्याची थंडी अन् मुसळधार बर्फवृष्टी! देशाचे रक्षण करतानाही भारतीय जवानांच्या चेहऱ्यावर हास्य, लुटला क्रिकेटचा आनंद, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या याचा प्रयत्य आणणार एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय जवान जोरदार बर्फवृष्टी होत असतानाही आनंदात दिसत आहे. आपले देशाचे रक्षण आणि त्यासोबतच बर्फाच्छादित डोंगररांगामध्ये क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहे. बर्फाचा चेंडू तयार केला असून तेथीलच एका काठीला बॅट बनवली आहे. गुडघाभर बर्फात धावत आहे, कॅच घेत आहेत, फिल्डींग करत आहे. बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. कठीण परिस्थिती आपले मनोबल न तुटू ने देता आनंदाने कसे जगायचे हे आपल्या भारतीय जवानांकडून शिकावे. सध्या या दृश्याने लोकांना भावूक झाले आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @bharat.base या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे की, हा इंटरनेटवरील आजचा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने कठीण परिस्थितीत आनंदात जगायला शिकवतात, ते म्हणजे भारतीय जवान असे म्हटले आहे, हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या थेट मनाला भिडला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






