ताईंचा विषय लय हार्ड ए! साडीला आग लावून केला जबरदस्त डान्स; पाहून युजर्स म्हणाले, "आग लगा दी"; मजेदार Video Viral
सोशल मीडियावर अनोख्या आणि आश्चर्याने भरलेल्या व्हिडिओजची काही कमी नाही. इथे नेहमीच अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. लोक स्वतःला व्हायरल करण्यासाठी इथे नको नको ते प्रकार करू पाहतात. यात बऱ्याचदा लोक आपल्या जीवाचाही विचार करत नाहीत आणि असाच एक प्रकार इथे व्हायरल झाला आहे ज्यात एक महिला स्वतःच्या साडीला आग लावून डान्स करताना दिसून आली आहे. महिलेच्या या कृत्याने आता युजर्सना आश्चर्याचा धक्का दिला असून यात पुढे काय घडलं ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात महिलेने पांढऱ्या रंगाची साडी आणि त्यावर काळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे आणि यासोबतच तिने आपल्या पदराला आग लावली असून तो पदर यात हळूहळू जळतानाही दिसून येत आहे. फक्त काही शुल्लक लाइक्ससाठी महिलेने केलेले हे कृत्य आता सर्वांनाच बुचकळ्यात टाकत आहे. ही आग जराही वाढली तर महिलेचा यात जळून मृत्यू होऊ शकतो. व्हिडिओमध्ये महिला साडीच्या पदराला आग लावून त्याला फ्लॉन्ट करत गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या मागे काही महिलाही अचंबित होऊन हा सर्व प्रकार पाहत असल्याचे दिसत आहे पण महिलेच्या अंगात रीलची अशी नशा भरलेली असते की जगाचाच काय तर स्वतःचाही विचार न करता बेधुंद होऊन आगीच्या या ज्वलंत साडीसह नाचत राहते. रीलसाठी आपला जीव धोक्यात घालण्याची ही कल्पना युजर्सनाही नाराज करत असून अनेकांनी यावर कमेंट्स करत महिलेच्या या कृत्यावर आपले मत व्यक्त केले आहे.
दरम्यान महिलेचा हा व्हायरल व्हिडिओ @more_fun_007 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खुपच मुर्ख पणा.काही अघटित झालं तर हा स्टंट जीवावर बातमीकडे मग समजलं असते या बयाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पागल लोक असेच असतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आग चुकीच्या जागी लावली आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.