पाकिस्तानच्या रेव्ह पार्टीमध्ये करीना कपूरने मारले ठुमके? 'बेबो'चा अनोखा अवतार पाहून युजर्स झाले आवाक्; Video Viral
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानची कारकीर्द हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांनी भरलेली आहे. त्यांचे नाव केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. बॉलिवूडची ही बेबो इंटरनेटवर नेहमीच फार ऍक्टिव्ह असते. अशात आताही तिचा एक अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मात्र हा व्हिडिओ पाकिस्तानातील आहे, ज्यात बेबो (करीना कपूर) चक्क नाचताना दिसून आली. हा व्हिडिओ पाकिस्तानातील कराची इथला असून करीना इकडे काय करत आहे असा प्रश्न आता अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे.
खरंतर, करीनाचे अॅनिमेशन पाकिस्तानातील कराची येथील एका रेव्ह पार्टीत दाखवण्यात आले होते. ज्यामध्ये करीना नाचताना दिसली. पण भारतीय वापरकर्त्यांना हे अॅनिमेशन फारसे आवडले नाही आणि आता लोक कमेंट सेक्शनमध्ये त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. पाकिस्तानी निर्मात्याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये ते बनवण्यामागील हेतू देखील स्पष्ट केला आहे. तथापि, व्हिडिओमध्ये, पाकिस्तानी लोक या ॲनिमेशनमध्ये करीनाला पाहून वातावरणाचा पुरेपूर आनंद घेताना दिसून आले.
या ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये करीना कपूर एका रेव्ह पार्टीमध्ये नाचतानाचे ॲनिमेशन दाखवण्यात आले आहे, जे फार अद्भुत दिसत आहे. करीनाचे अॅनिमेशन मोठ्या पडद्यावर सादर केले आहे. ज्यामध्ये ती प्रसिद्ध चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ मधील आयकॉनिक संवादावर सादरीकरण करताना दाखवते. पार्टीत उपस्थित असलेले पाकिस्तानी लोक या क्षणाचा खूप आनंद लुटतात. काही सेकंदाच्या या क्लिपमध्ये लोकांचा जल्लोष स्पष्ट दिसून येतो. मोठ्या पडद्यावर करीनाला पाहून पार्टीत उपस्थित असलेले लोक मोठ्याने ओरडू लागतात आणि या क्षणाचा पुरेपूर आनंद घेतात.
हा व्हायरल व्हिडिओ @mr.shotbox नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक आता यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पाकिस्तानमध्ये रेव्ह कधी सुरू झाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिने खटला दाखल करायला हवा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.