(फोटो सौजन्य – Instagram)
सोशल मीडियावर अनेक अनोख्या गोष्टी व्हायरल होत असतात ज्या आपल्याला थक्क करून जातात. इथे बऱ्याचदा लोक आपली प्रेमकहाणी देखिल शेअर करतात. लोक वेगवेगळ्या देशांचे असूनही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि ते प्रेम मिळवण्यासाठी सर्व सीमा ओलांडण्यास तयार असतात. मागील काही काळापासून अशा घटना फार वाढल्या आहेत आणि अशातच आता आणखीन एक अशीच घटना सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे, ज्यातील प्रेमकहाणीने लोकांची मन जिंकली आहेत.
वडिलांच्या शवपेटीला पुरता पुरता संपूर्ण कुटुंबच कबरीत जाऊन पडलं; पुढे काय घडलं… Video Viral
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण एका हाय मेसेजवर ही लव्ह स्टोरी सुरु झाली आणि अमेरिकन महिला थेट आंध्रच्या मुलाच्या प्रेमात पडली. इतकेच आता लवकरच ते विवाहबंधनात देखील अडकणार आहेत. आपल्या या लव्हस्टोरीचा व्हिडिओ महिलेने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे जो तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, दोन वेगवेगळ्या जगातून असूनही, ती एका पुरूषाला ऑनलाइन कशी भेटली आणि महिने ऑनलाइन डेटिंग केल्यानंतर, ती खऱ्या आयुष्यात त्याला भेटण्यासाठी भारतात गेली. व्हिडिओमध्ये, जॅकलिन फोरेरो, जी व्यवसायाने छायाचित्रकार आहे, तिची प्रेमकथा शेअर करते. ती सांगते की आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावात राहणाऱ्या चंदनला तिची कशी भेट झाली आणि त्यांच्या संभाषणाची सुरुवात इंस्टाग्रामवरून झाली.
व्हिडिओमध्ये काही लहान क्लिप्सचा एक संग्रह दाखवण्यात आला आहे ज्यामध्ये ते दोघेही व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचे दिसत आहे. ८ महिने व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर, जॅकलीनने भारतात जाण्याचा निर्णय घेतला आणि चंदनला भेटण्यासाठी ती भारतात आली. या प्रेमकथेला आता एक नवीन वळण मिळाले आहे कारण १४ महिने एकमेकांना डेट केल्यानंतर, दोन्ही जोडपे एकत्र अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करत आहेत.
जॅकलिनने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंट @jaclyn.forero वर त्यांच्या लव्हस्टोरीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अजूनही हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या लव्हस्टोरीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तो अद्भुत दिसतोय, त्याच्यात काहीतरी आहे. तो निष्पाप दिसतोय, आणि मी त्याचा अद्भुत आत्मा अनुभवू शकतो. तो नेहमीच तुमच्यासाठी असेल आणि तुमच्यावर प्रेम करेल, मी सहसा बरोबर असतो. खूप शुभेच्छा!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही स्टोरी आमच्या स्टोरशी मिळती जुळती आहे, आम्ही इथे इंस्टावर भेटलो. ७ महिन्यांनंतर मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी भारतात विमानाने जात होतो! ते ३.५ वर्षांपूर्वीचे होते आणि तो गेल्या एप्रिलमध्ये अमेरिकेत आला होता! हा एक वेडा प्रवास आहे पण तो खूप फायदेशीर आहे “.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.