
काशी विश्वनाथ मंदिरात बनावट पुजाऱ्याचा भांडाफोड; दर्शनासाठी मागितले ४ हजार रुपये, मग पोलिसांनी जे केलं... Video Viral
झटपट दर्शनाच्या नावाने उकळले हजारो रुपये…
म्हैसूरहून एक महिला भक्त वाराणसीच्या चेतगंजचा रहिवासी असलेल्या आरोपी बसंत पांडे याच्याजवळ गेली. लांब रांगेत न लागता डायरेक्ट झटपट दर्शन घेण्यासाठी त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. जलद दर्शनाच्या आमिषाला बळी पडून महिलेने त्याला ४,००० रुपये दिले. इतकंच नाही तर आरोपी दलालाने महिलेसह आणखी चार जणांशी सहज दर्शनाच्या नावाखाली पैशांच्या लेणदेणची बोलणी करुन ठेवली होती.
आमिषाला बळी पडलेली महिला जेव्हा मंदिर परिसरात उभी होती तेव्हा ऑन ड्युटीवर असलेले सिगरा पोलिस ठाण्यातील इंस्पेक्टर शिवाकांत मिश्रा आपल्या सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. महिलेला रडताना पाहून जेव्हा त्यांनी सर्व घटनेची चाैकशी केली तेव्हा फसवणूकीच्या प्रकाराचा उलगडा झाला. यानंतर इंस्पेक्टर तत्काळ आजूबाजूच्या दुकानांमध्ये चाैकशी केली ज्यातून दलालाची ओळख बसंत पाण्डेय अशी झाली. पोलिसांची उपस्थिती जाणवताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता परंतु इंस्पेक्टर शिवाकांत मिश्रा यांनी आपल्या सतर्कतेच्या जोरावर आरोपीला फरार होण्याआधीच पकडलं.
Fake priest at Kashi Vishwanath charged a devotee ₹4000 for free darshan. Police made him return the money.
pic.twitter.com/SgGmEAWAnt — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 3, 2026
लुटलेले पैसे केले परत…
पोलिसांनी आरोपीला पकडत सर्व सत्यतेची पडताळणी केली आणि आरोपीने पिडित महिलेकडून घेतलेले ४००० रुपये सुरक्षितरित्या तिला परत केले. यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी अधिकारी आरोपीला पोलिस ठाण्यात घेऊन आले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.