(फोटो सौजन्य: X)
व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बाॅय मुलाचे प्राण वाचवताना दिसतो. गाडी समोर असताना मुलाचा अपघात होणारच असतो तितक्यात बाजूला उभा असणारा डिलिव्हरी बाॅय गाडीच्या समोर येतो आणि अवघ्या काही सेकंदातच मुलाला गाडीसमोरुन मागे खेचतो. डिलिव्हरी बाॅयचे प्रसंगावधान मुलाचे प्राण वाचवण्यास मदत करते, ज्यामुळे सोशल मिडियावर आता त्याच्या या कृतीचे चांगलेच काैतुक केले जात आहे.
काय घडलं व्हिडिओत?
सदर घटना ही जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचे फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, रस्ता ओलांडण्यासाठी एक मुलगा वेगाने रस्त्याच्या दिशेने धावत जातो. रस्ता ओलाेंडताना त्याचे लक्ष समोरुन येणाऱ्या गाडीकडे जात नाही ज्यामुळे मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होते. रस्ता ओलांडण्याच्या नादात मुलगा भरधाव ट्रकच्या समोर येतो ज्यानंतर अपघाताची स्थिती निर्माण होते. डिलिव्हरी बाॅय हे दृष्य आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि क्षणाचाही विलंब न करता ट्रकसमोरुन मुलाला खेचत बाजूला ओढतो.
मुलाला खेचल्यानंतर अवघ्या एका सेंकदातच ट्रक मुलाच्या बाजूने पुढे जाते. याचा अर्थ सेकंदाचाही जर विलंब झाला असता तर मुलगा अपघाताला बळी पडण्याची शक्यता होती. निष्पाप मुलाला वाचवण्यासाठी डिलिव्हरी बाॅयने घेतलेली धडपड पाहून आता यूजर्स त्याच्या कृतीवर काैतुकांचा वर्षाव करत आहे. इतर वेळी जेव्हा लोक मदत करण्याऐवजी घटनेचे दृष्य फोनमध्ये कैद करण्यास पहिले प्राधान्य देतात तिथेच डिलिव्हरी बाॅयने मात्र माणूसकीला पहिले प्राधान्य दिले. यूजर्स त्याच्या हिमतीवर चांगलेच खुश झाले असून रिअल लाईफ हिरो अशी उपमा डिलिव्हरी बाॅयला दिली जात आहे.
कभी-कभी एक अनजान इंसान भी किसी के लिए फरिश्ता बन जाता है। सड़क पर एक मासूम बच्चा तेज़ रफ्तार ट्रक की चपेट में आने ही वाला था, तभी एक डिलीवरी बॉय ने बिना अपनी जान की परवाह किए दौड़कर उसे सुरक्षित बचा लिया। कुछ ही सेकेंड की उसकी हिम्मत ने एक मासूम की जिंदगी बचा ली। यह भावुक… pic.twitter.com/j3q7X3BX33 — Mandeep RajBhar (@MandeepRajBhar9) August 2, 2026
दातांनी कार ओढत सुरू केली अनोखी कावड यात्रा! व्यक्तीच्या शिवभक्तीने वेधले लोकांचे लक्ष; Video Viral
घटनेचा हा व्हिडिओ @MandeepRajBhar9 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत १ मिलियनहून अधिकचे लाईक्स मिळाले असून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “मुलांन असं एकट नाही सोडायला पाहिजे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर काही सेकंदांचे हे धाडस नसते, तर कदाचित आजची बातमी वेगळी असती”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्या माणसाकडे कमांडोसारखी अविश्वसनीय चपळता आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






