
Kelvan Celebration in Mumbai Local Train
लग्नाआधी लग्न ठरलेल्या जोडप्यासाठी मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांकडे जेवणाला जाणाचा कार्यक्रमत असते. त्याला केळवण म्हणतात. सहसा हा कार्यक्रम घरी आयोजित केला जातो. पण मुंबईसारख्या धावत्या शहरात लोकांना वेळ मिळत नसल्याने भन्नाट आयडीयाच काढण्यात आली आहे. थेट लोकलमध्येच केळवण केलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर एका तरुणाच्या केळवणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये पाहू शकता की लोकलच्या एका डब्यात केळीचं पानं चिकटवण्यात आले आहे. त्यावर संयोगचे केळवणं असे लिहिण्यात आले आहे. कसारा ते मुंबई लोकल या मार्गावर हे केळवणं करण्यात आलं आहे. तरुण ट्रेनमध्येच चढताच त्याचे चकमक उधळून स्वागत करण्यात आले आहे. तसेच त्याच्यासाठी एका ताटात पुरी-भाजी, श्रीखंड वाढलेले आहे. सगळेजण फोटो व्हिडिओ काढत आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @yogeshporje77 यावर शेअर केला आहे. व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यांने म्हटले आहे भावा, आमंत्रण दिलं नाहीस असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने आता लग्न बघायचं बाकी आहे, ते पण करुन टाका कोणीतीरी असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एका मुंबईरांची स्टाईलचं वेगळी आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.