(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
सदर घटना रात्री १० वाजताच्या सुमारास ब्लू लाईनवरील भवानीपूर येथील नेताजी भवन स्थानकावर घडून आली. मेट्रो अधिकाऱ्यांचे मते, दोन महिला प्रवासींनी कोणत्याही कारणाशिवाय आरपीएफ महिला जवानासोबत भांडण करायला सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओत दोन महिला आरपीएफ महिलेवर हल्ला करताना आणि अधिकाऱ्याला मारताना स्पष्ट दिसून आल्या. ही हाणामारी साधी नव अधिकाऱ्याचे केस पकडत, जमिनीवर लोळवत महिला या हाणामारीत आरपीएफ महिलेला मारत असतात. हा हाय व्होल्टेज ड्रामा पुढे जाऊन इतका वाढतो की, यात इतर आरपीएफ अधिकारी आणि आजूबाजूने जाणाऱ्या प्रवाशांना अखेर हस्तक्षेप घ्यावा लागतो. व्हिडिओच्या शेवटी सर्वजण दोन्ही महिलांना आरपीएफ अधिकाऱ्यापासून वेगळे करताना दिसून येतात.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही महिलांनी सुरुवातील ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केले. यावर कारवाई करण्यासाठी जेव्हा RPF कर्मचारी घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी समजूत काढत महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतरही जेव्हा महिला ऐकल्या नाहीत तेव्हा त्यांच्यावर प्रत्येकी १००० रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच ट्रेंड करत असून महिलांच्या या वर्तनावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
🚨 WOMEN PASSENGERS SCUFFLE WITH RPF STAFF AT KOLKATA METRO Two female passengers allegedly got into a scuffle with on-duty RPF personnel at Netaji Bhawan Metro Station in Kolkata on September 7. According to Metro authorities, the women misbehaved with staff and were later… pic.twitter.com/cWbHaDSgBJ — contentkikamii (@contentkikamii) September 10, 2026
आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!
हा व्हिडिओ @contentkikamii नावाच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला चांगलेच व्हूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “एवढा राग आला तरी सार्वजनिक ठिकाणी अशी मारामारी योग्य नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण नक्की घडलं काय?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “रेल्वे स्थानक म्हणजे कुस्तीचा नवा आखाडा झालाय”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






