ताई, ते मी फक्त पाणी चेक करायला आलो होतो! बाथरूमच्या खिडकीतून टकमक पाहू लागला अन् जंगलाच्या राजाचा मजेदार Video Viral
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. इथे बऱ्याचदा अनेक धक्कादायक व्हिडिओ शेअर केले जातात ज्यातील दृश्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. त्याचबरोबर इथे काही मजेदार व्हिडिओ देखील शेअर होतात जे मनोरंजनाचे काम करतात. इथे प्राण्यांचे व्हिडिओज देखील शेअर केले जातात जे इंटरनेटवर लोकांना पाहायला फार आवडतात. यातून प्राण्यांचे आयुष्य जवळून पाहता येते. आता मात्र सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक वाघ घराच्या बाथरूममध्ये डोकावताना दिसून आला.वाघाचा हा प्रताप आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, लोक त्याचा हा व्हिडिओ वेगाने शेअर देखील करत आहेत. चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात आपल्याला एका बाथरूममधील दृश्य दिसून येत आहेत. कॅमेरा बाथरूमच्या बेसिनवर असतो आणि जसा कॅमेरा अँगल बदलतो आपल्याला यात सिंहाचे दर्शन घडते. बाथरूममध्ये असलेल्या ओपन खिडकीत आपलं डोकं टाकून तो बाथरूममध्ये काय आहे ते पाहण्यासाठी इथे आलेला असतो. खिडकीतून डोकावताच तो बाथरूममध्ये जिकडे तिकडे बघत राहतो आणि मग मान खाली घालून आपल्या हातांना चाटू लागतो. वाघ हा जंगलाचा राजा असून तो धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. हा एक असा प्राणी आहे की त्याला पाहताच सर्वांचा थरकाप उडतो मात्र बाथरूममधील वाघाची ही गुपचूप एंट्री आता सर्वांना हसू अनावर करत आहे. त्याच्याकडे बघून असं वाटतं आहे की तो म्हणतोय,” बघू जरा इथे काय आहे, अरेरे माफ करा बाई मी चुकून इथे आलो”.
दरम्यान वाघाचा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वाघ तर लयच चाबरट निघाला ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे तू जंगलाचा शिकारी ना मग असा चोरावानी काय घुसतोय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे भारी आहे “.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.