(फोटो सौजन्य: Instagram)
प्रेम प्रकरणांचा सिलसिला दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणांमध्ये प्रेमाची हवा वेगाने पसरत असून याची अनेक मनोरंजक उदाहरणे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. आता प्रेम करणं सोपं असलं तरी घरच्यांचा विरोधात जाऊन ते निभावणं आणखीन कठीण… अशात अनेक प्रेमीयुगील आपल्या प्रेमासोबत वेळ घालवण्यासाठी कोणते ना कोणते कारण सांगून घराबाहेर पडतात आणि एकमेकांना वेळ देतात. प्रेमाची ही गाथा काही आताही नाही, फार पूर्वीपासून लपून छपून प्रेम कारणं सुरु आहे आणि हीच तर प्रेमाची मजा आहे.
सून आहे की राक्षसीण? ७८ वर्षीय सासूचं मारून मारून तोंड सुजवलं; कपडे फाडले अन् धक्कादायक Video Viral
पूर्वी आपल्या जोडीदाराला काही मेसेज द्यायचा असला की चिठ्ठीचा वापर केला जायचा आता मात्र प्रेमीयुगुल आपला संदेश पाठवायचा असेल तर पैशांच्या नोटीचा वापर करू लागले आहेत. कुणाला संशय येऊ नये म्हणून नोटीवर संदेश लिहिला जातो आणि तो प्रियकराकडे पाठवला जातो मात्र हाच संदेश नको त्या व्यक्तीच्या हातात आला तर काय होईल याचा विचार करा. सध्या अशीच एक प्रेमाची नोट सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे, यात प्रेयसीने आपल्या प्रियकरासाठी एक खास संदेश लिहिला आहे जो वाचून सोशल मीडियावर मात्र हास्याचा पूर आला आहे. चला यात नक्की काय लिहिलं होतं ते जाणून घेऊया.
काय लिहिलं आहे नोटीवर?
व्हायरल नोटीवर लिहिण्यात आलेला हा मेसेज शुभम नावाच्या मुलासाठी लिहिण्यात आला आहे. ही नोट २० रुपयांची असून यावर एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडसाठी एक खास संदेश लिहिला आहे. यात तिने लिहिले आहे की, “शुभम कराड स्टेशनला नको, घाटावर भेट… स्टँडवर पप्पा आहेत”. नोटीवर लिहिलेला हा मेसेज आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक या अनोख्या संकल्पनेची जोरदार मजा लुटत आहेत. नोतेमार्फत आपल्या प्रियकराला सिक्रेट मेसेज देण्याचा प्रेयसीचा प्रयत्न सपशेल फेल गेल्याचे दिसून येत आहे कारण ही नोट आता संपूर्ण इंटरनेटवर व्हायरल झाली आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @litsatara नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिकडे पाऊस सुरु होता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बहुतेक हिचा पप्पा वडाप चालवतोय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भावा नीरोप भेटला गेलो होतो पण ती थे तीच्या पपाच्या ऐवजी तीजा x थांबला होता आत्ता ड्रम मधून बोलतोय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.