सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. शिवाय यामध्ये लहान मुलांचे देखील अनेक मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा ही लहान मुले काय बोलती, काय प्रश्न विचारतील, किंवा काय करतीय हे सांगणे कठीण असते.
अनेकदा मोठ मोठ्या लोकांची आपल्या प्रश्नांनी बोलती बंद करुन टाकतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका चिमुकलीने आपल्या आई-वडिलांना असे असे प्रश्न विचारले आहे की, त्यांना देखील काय बोलायचे ते सुचलेले नाही. सध्या या हैराण करणाऱ्या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. चिमुकलीला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली आपल्या आई-वडिलांसोबत बसलेली असते. चिमुकली असा प्रश्न विचारते की तिचे मम्मी-पप्पा हैराण होऊन जातात. तिचे प्रश्न ऐकून तिची आई खूप हसत असते. या व्हिडिओमध्ये चिमुकली आपल्या पालकांना इतेक विचित्र प्रश्न विचारत आहे की, तिच्या वडिलांना देखील याचे उत्तर देता आलेले नाही.
शिवाय एकामागून एक प्रश्न ती विचारत असते. चिमुकली विचारते की, तुझा नवरा माझे बाबा का आहेत?, तर यावर तिची आई मला माहित नाही बाळा असे म्हणते. तसेच हाच प्रश्न ती वडिलांना देखील विचारते. चिमुकली म्हणते की, बाबा तुमची आई वेगळी आहे आणि मम्मीची आई वेगळी आहे मग तुम्ही एकत्र का राहता, तुम्ही तुमच्या आईकडे जा असे म्हणत असते. तिच्या या प्रश्नांनी तिच्या पालकांना गोंधळात टाकले आहे. तिचे मम्मी-पप्पा तिला विचारतात नक्की काय विचारायचे आहे तुला, तर यावर चिमुकली तुम्हाला तर काही समजतच नाही असेही म्हणते.
व्हायरल व्हिडिओ
प्रेग्नेंसी के दौरान बादाम खाने का नतीजा 😂🔥💥🤣
मम्मी पापा की बोलती बंद कर दी 🔥💥🔥 pic.twitter.com/7EVDba0iAz — Mahima Yadav (@SinghKinngSP) July 16, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SinghKinngSP शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “आता लग्नाचा अर्थ सांगू नका नाहीतर अजून प्रश्न विचारेल” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने, “बरोबर आहे तिचे” असे म्हटले आहे. अनेकांनी हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.