Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरवलेल्या चिमुकल्या गजराजाची आईशी करून दिली भेट; धावत पळत आला अन् आईलाच बिलगला; क्युट Video Viral

Baby Elephant Video: आपली आई आसपास नाही हे जाणवतच हत्तीचे पिल्लू घाबरते आणि वन-विभागाकडे मदत मागू लागते. त्यानंतर वन-विभाग चिमुकल्या हत्तीचे त्याच्या आईशी मिलन करून देते. घटनेचा सुंदर व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 09, 2025 | 10:54 AM
हरवलेल्या चिमुकल्या गजराजाची आईशी करून दिली भेट; धावत पळत आला अन् आईलाच बिलगला; क्युट Video Viral

हरवलेल्या चिमुकल्या गजराजाची आईशी करून दिली भेट; धावत पळत आला अन् आईलाच बिलगला; क्युट Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

कोणतेही मुलं हे आपल्या आईशिवाय राहू शकत नाही. आईची माया आपल्या बाळाला एका क्षणासाठीही वेगळं करू देत नाही. आई मुलामधील जिव्हाळ्याचे हे नाते फक्त माणसांमधीच नाही तर प्राण्यांमध्येही तितकेच घट्ट असते. आई-मुलाच्या नात्याची नव्याने ओळख करून देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वन-विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका हरवलेल्या हत्तीची त्याच्या आईशी भेट करून दिल्याचे दिसून येत आहे. आईला पाहताच हत्ती इतका आनंदित होतो की धावत पळत आईला जाऊन बिलगतो. हत्तीचे हे गोंडस रूप आणि आईवरची त्याची माया पाहून आता सर्वच सुखावून गेले आहेत. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

भयानक! अजगराने जिवंत माणसाला गिळलं, पोट फडताच जे दिसलं… कमकुवत हृदय असणाऱ्यांनी अजिबात पाहू नका; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात वन अधिकाऱ्यांच्या मदतीने एका हत्तीच्या बाळाचे त्याच्या आईशी मिलन करून देण्यात आले. निवृत्त भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा या घटनेचा एक सुंदर व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक अतिशय भावनिक क्षण दिसून येत आहे, ज्यात हत्तीचे बाळ मदतीसाठी वन विभागाच्या वाहनाकडे धावते. व्हिडिओमध्ये हत्तीचे बाळ घाबरत आपल्या आईला शोधत असल्याचे समजते. वनविभाग अधिकारी काळजीपूर्वक हत्तीच्या बाळाची त्याची आईशी भेट करवून देतात. ते त्याला त्याची आई ज्या भागात आहे तिथे घेऊन जातात ज्यानंतर आपल्या आईला पाहताच चिमुकला हत्ती खुश होतो आणि धावत पळत आईजवळ जात तिच्यासोबत जंगलात निघून जातो. घटनेचा व्हिडिओ फारच सुंदर असून प्राण्यांमधील हे जिव्हाळ्याचे नाते पाहून आता सर्वचजण भावुक होऊन गेले आहेत. लोक पुन्हा पुन्हा हे दृश्य पाहत असून याचा व्हिडिओ आता वेगाने शेअर केला जात आहे.

पोलीसच बनले चोर! प्रवाशांच्या थेट खिशात घातला हात अन्…; VIDEO तुफान व्हायरल

चिमुकल्या हत्तीचा हा व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण त्यांना कसे समजले की तीच त्याची आई आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “छोटू” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आनंदी पुनर्मिलन”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Lost baby elephant reunited with his mother beautiful video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • Elephant Video
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील
1

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील

‘कच्ची कली’ गाण्यावर काकांनी घातला धुमाकूळ; असा जबरदस्त डान्स केला लोक पाहतच राहिले, Video Viral
2

‘कच्ची कली’ गाण्यावर काकांनी घातला धुमाकूळ; असा जबरदस्त डान्स केला लोक पाहतच राहिले, Video Viral

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral
3

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर
4

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.