Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: ‘सेल्फी नको, एक Kiss दे ना…’, विदेशी यूट्यूबरकडे तरुणाची मागणी, तरुणी नकार दिला म्हणून…; व्हिडीओ व्हायरल

Viral Video: राजस्थानमधील उदयपूर येथे लाइव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या थाई-फ्रेंच यूट्यूबर जस्टकेथ हिच्यासोबत एका तरुणाने अनुचित मागणी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यूट्यूबरने स्पष्ट नकार दिल्यानंतरही तरुणाने वारंवार तीच मागणी केली. या व्हिडीओला ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 16, 2026 | 02:06 PM
'सेल्फी नको, एक Kiss दे ना…', विदेशी यूट्यूबरकडे तरुणाची मागणी, तरुणी नकार दिला म्हणून...; व्हिडीओ व्हायरल

'सेल्फी नको, एक Kiss दे ना…', विदेशी यूट्यूबरकडे तरुणाची मागणी, तरुणी नकार दिला म्हणून...; व्हिडीओ व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • विदेशी यूट्यूबरला तरुणाने मागितली किस!
  • उदयपूरमधील प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल
  • नेटकऱ्यांचा संताप
Viral Video: राजस्थानमधील उदयपूर हे शहर आपल्या सुंदर तलाव, ऐतिहासिक वास्तू आणि पर्यटनस्थळांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. देश-विदेशातून अनेक पर्यटक येथे भेट देतात. मात्र, याच उदयपूरमधील एका व्हायरल व्हिडीओमुळे पर्यटकांशी वागण्याच्या पद्धतीवर आणि महिलांच्या संमतीच्या अधिकारावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. एका विदेशी यूट्यूबरसोबत तरुणाने केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थाई-फ्रेंच यूट्यूबर जस्टकेथ उदयपूरमधील एका गजबजलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी लाइव्ह स्ट्रीमिंग करत होती. ती आपल्या ऑनलाइन प्रेक्षकांशी संवाद साधत असतानाच एक तरुण तिच्याजवळ आला. सुरुवातीला हा तरुण तिच्याशी बोलू लागला. मात्र, त्याने फोटो किंवा सेल्फी काढण्याची विनंती करण्याऐवजी ‘एक Kiss दे ना…’ अशी विचित्र मागणी केल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

Woman Fake TTE Viral Video : बनावट TTE चा अजब प्रकार ! गळ्यात चिनी ID कार्ड, प्रवाशांकडून हजारो रुपये वसुलीचा प्रयत्न

तरुणीकडे विचित्र मागणी

तरुणाची मागणी ऐकल्यानंतर यूट्यूबर अस्वस्थ झाली. तिने स्पष्टपणे नकार देत आपल्याला अशी गोष्ट आवडत नसल्याचे सांगितले. मात्र, तिचा नकार स्वीकारण्याऐवजी तरुणाने वारंवार तीच मागणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे यूट्यूबरची अस्वस्थता वाढल्याचे व्हिडीओत दिसते. तिला या प्रसंगातून बाहेर पडायचे असल्याचे तिच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून जाणवत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

काही वेळानंतर तरुणाने आपली मागणी बदलून तिच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी यूट्यूबरने काहीशी अस्वस्थ असतानाही फोटोसाठी होकार दिला. प्रसंग संपताना तरुणाने तिच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने हात मिळवण्याऐवजी फिस्ट बंप देऊन तेथून निघण्याचा मार्ग स्वीकारला. यानंतर जस्टकेथने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. त्यासोबत तिने, ‘कमीत कमी त्याने विचारले तरी,’ अशा आशयाची प्रतिक्रिया दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, त्याला ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले.

नेटकऱ्यांमध्ये संमतीच्या अधिकारावर चर्चा

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तरुणाच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या व्यक्तीने स्पष्ट नकार दिल्यानंतरही वारंवार तीच मागणी करणे चुकीचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. तर काहींनी विदेशी पर्यटकांसोबत अशा प्रकारचे वर्तन घडल्यास देशाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झाल्याची किंवा कोणतीही अधिकृत कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही. संबंधित तरुणाची ओळखही अद्याप उघड झालेली नाही. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र सार्वजनिक ठिकाणी महिलांशी संवाद साधताना त्यांच्या इच्छेचा आणि वैयक्तिक मर्यादांचा आदर करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आ

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क

💡

Frequently Asked Questions

  • Que: उदयपूरमधील व्हायरल व्हिडीओमध्ये कोण दिसत आहे?

    Ans: या व्हिडीओमध्ये थाई-फ्रेंच यूट्यूबर जस्टकेथ दिसत असून, तिच्याशी एका तरुणाने अनुचित मागणी केली.

  • Que: यूट्यूबरने तरुणाच्या मागणीला काय उत्तर दिले?

    Ans: यूट्यूबरने सुरुवातीला स्पष्ट नकार दिला. मात्र, तरुणाने वारंवार तीच मागणी केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे का?

    Ans: अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झाल्याची किंवा कारवाई झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Web Title: Udaipur foreign youtuber live stream inappropriate demand viral video sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Social Media
  • viral video

संबंधित बातम्या

मुंबईच्या गल्लीत सचिनसोबत ब्रिटनच्या विल्यम-केट खेळले क्रिकेट; कुल्हडचा चहा अन्…; Video Viral
1

मुंबईच्या गल्लीत सचिनसोबत ब्रिटनच्या विल्यम-केट खेळले क्रिकेट; कुल्हडचा चहा अन्…; Video Viral

Woman Fake TTE Viral Video : बनावट TTE चा अजब प्रकार ! गळ्यात चिनी ID कार्ड, प्रवाशांकडून हजारो रुपये वसुलीचा प्रयत्न
2

Woman Fake TTE Viral Video : बनावट TTE चा अजब प्रकार ! गळ्यात चिनी ID कार्ड, प्रवाशांकडून हजारो रुपये वसुलीचा प्रयत्न

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क
3

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क

Suryakumar Yadav Viral Video : मैदानावर स्टार, जेवणात साधेपणा ! सूर्यकुमार यादव-सरफराज खानचा मटण पार्टीचा VIDEO व्हायरल
4

Suryakumar Yadav Viral Video : मैदानावर स्टार, जेवणात साधेपणा ! सूर्यकुमार यादव-सरफराज खानचा मटण पार्टीचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.