पोलीसच बनले चोर! प्रवाशांच्या थेट खिशात घातला हात अन्...; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ट्रेन, बसमध्ये तर अनेक चोरीच्या घटना सतत घडतात. अशा वेळी प्रत्येक प्रवाशाची आपल्या वस्तूंची काळजी घेणं स्वत:ची जबाबादरी असते. मात्र अनेकदा प्रवासी याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे चोरांना संधी मिळते आणि गर्दीचा फायदा घेत चोरी करतात. यावर आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा कर्मचारी आणि रेल्वे प्रोफोर्स सतत प्रयत्नशील असतात. यासाठीच रोल्वे प्रोफोर्सच्या टीमने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ट्रेनमध्ये नेमकी चोरी कशी केली जाते, कसे प्रवाशांच्या दुर्लक्षतेमुळे त्यांचैे नुकसान होते याबद्दल सांगितले आहे.
तसेच अशा घटना कशा टाळायच्या यावरही काही टिप्स या पोलिसांनी दिल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका आपपीएफ जवानाने रेल्वेच्या डब्यात एक डेमो दाखवला आहे. या जवानाने जनरल डब्यात झोपलेल्या एका प्रवाशाच्या खिशातून मोबाईल चोरुन घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वरच्या सीटवर झोपलेल्या व्यक्तीला याची कल्पानाही आली नाही. यानंतर जवानेने प्रवाशाला तुझा फोन कुठे आहे असा प्रश्न विचारला आहे.यावर प्रवासी घाबरुन फोन शोधू लागतो. प्रवासी फोन वरच्या खिशात ठेवून गाढ झोपलेला असतो. त्याची ही चूक त्याला कशी नडते हे पोलिसांनी या डेमोतून दाखवुन दिले आहे. पोलिसांनी सर्व प्रवाशांना फोन पॅंटच्या खिशात ठेवण्यास तसेच सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रात्रि समय में ट्रेन में ऐसे ही यात्रियों के सामान की चोरी होती है जिसका एक वीडियो बनाकर लोगों को जागरूक करते हुए रेलवे पुलिस… pic.twitter.com/jUICpLoJbO
— Geeta Patel (@geetappoo) July 8, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @geetappoo या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. अनेकांनी पोलिसांच्या या कृतीचे कौतुक केले आहे. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा एक चांगला प्रयत्न असल्याचे लोकांनी म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.