चॉकलेटमध्ये बनावटी दात आढळून आले
मागेच एका व्यक्तीने ऑनलाईन मागवल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळून आल्याची घटना घडली होती. या घटनेने अनेकजण चकित झाले होते त्यानंतर आता पुन्हा तशीच एक धक्कादायक घटना घडून आली आहे. यावेळी एका प्रसिद्ध ब्रँडच्या चॉकलेटमध्ये चक्क बनावटी दात आढळून आले आहे. या घटनेने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत आणि आता ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये एक धक्कादायक घटना घडून आली. मिळालेल्या माहितीनुसार, खरगोनमधील एका खासगी शाळेच्या निवृत्त शिक्षिकेला भेट म्हणून एक चॉकलेट मिळाले. हे चॉकलेट त्यांनी खाण्यासाठी जेव्हा घेतले तेव्हा त्यांना हा चॉकलेट खाताना यात काहीतरी कडक वस्तू असल्याचे भासले पण त्यावेळी त्यांना वाटले की यात ड्रायफ्रूट असावेत मात्र जेव्हा हा पदार्थ चावला गेला नाही तेव्हा त्यांनी याला तोंडातून बाहेर काढून बघितले. तोंडातून चॉकलेट बाहेर काढताच त्यांना यात ऐकून चार नकली दात आढळून आले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय बनला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच अन्न सुरक्षा आणि औषध विभागाचे पथक चॉकलेटच्या स्थानिक वितरकाकडे पोहोचले आणि त्यांनी चॉकलेटचे नमुने घेऊन ते भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवले आहेत. ही घटना ज्या शिक्षिकेसोबत घडली त्यांचे नाव मायादेवी गुप्ता असे आहे. मायादेवी आस्थाग्राम नावाच्या ट्रस्टमध्ये मोफत सेवा देतात आणि तिथे मुलांना शिकवतात. यातीलच एका मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हे चॉकलेट गिफ्ट म्हणून होते. चार-पाच दिवसांनी हे चॉकलेट खात असताना त्यांना तोंडात काहीतरी अडकल्यासारखे वाटले. त्यानंतर तोंडातून चॉकलेट बाहेर काढून बघितले असता त्यांना यात हा बनावटी दात आढळले.
या प्रकारचा तपास करण्यात येत आहे, असे खते आणि औषध विभागाचे अधिकारी एच. एल. अवसिया यांनी सांगितले आहे. दरम्यान आता ही धक्कादायक घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांच्या यावर निरनिराळ्या प्रतिक्रया येत आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीची लाट पसरत आहे.