Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यमराज घ्यायला आलेच होते तितक्यात… मृत्यूपासून एक इंच दूर होता तरुण, साडीचा आधाराने वाचला जीव; थरारक Video Viral

Incident Video : माळशेज घाटावर घडली जीवघेणी घटना. सेल्फीच्या नादात जीव टांगणीला लागला पण पर्यटकांच्या प्रसंगावधानाने परिस्थिती सावरली. ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2026 | 10:47 AM
यमराज घ्यायला आलेच होते तितक्यात... मृत्यूपासून एक इंच दूर होता तरुण, साडीचा आधाराने वाचला जीव; थरारक Video Viral

यमराज घ्यायला आलेच होते तितक्यात... मृत्यूपासून एक इंच दूर होता तरुण, साडीचा आधाराने वाचला जीव; थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • माळशेज घाटातील कालू धबधब्याजवळ सेल्फी घेताना तरुणाचा पाय घसरला.
  • प्रचंड पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या तरुणाला इतर पर्यटकांनी साडीचा दोर बनवून वाचवले.
  • प्रसंगावधानामुळे जीव वाचला; धबधब्यांजवळ सेल्फी किती धोकादायक ठरू शकतो, याची पुन्हा जाणीव झाली.
पावसाळ्यात अनेक पर्यटक माळशेज घाटाला भेट देतात. पावसाळी पर्यटनातील हे एक लोकप्रिय ठिकणा आहे. पण या ऋतूत अनेक निसर्गरम्य ठिकाणी जीवाचा धोका हा दुपटीने वाढत असतो. यामुळेच फिरायला जाताना पर्यटकांना आपल्या जीवाची विशेष काळजी घेणे फार गरजेचे ठरते. तुमची लहान चूक तुम्हाला मृत्यूजवळ नेऊन ठेवू शकते आणि असंच काहीसं सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी तरुण पाण्यात उतरला खरा पण हा त्याच्या जीवानातील एक वाईट अनुभव ठरला. नशीब मृत्यूच्या दारात पोहचवतंय की काय असं वाटत असतानाच साडीचा एक आधार तरुणाला गंभीर परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करतो. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

७७ वर्षांची प्रतीक्षा संपली! गावात पहिल्यांदाच पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना; Video Viral

काय आहे प्रकरण?

माळशेज घाटातील कालू धबधब्याजवळील सुंदर दऱ्यांमध्ये एक तरुण सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. पण याचवेळी पाण्याच्या प्रचंड प्रवाहात त्याचा पाय घसरला आणि तो धबधब्याच्या काठाशी येऊन पोहचला. काही क्षणांतच तो उतारावरून गडगडत खाली जाऊ लागला आणि त्याला वाचवणे जणू अशक्यच आहे असे वाटू लागले.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण तुम्ही ऐकली असेल, याचेच जिवंत उदाहर व्हिडिओत पाहायला मिळाले. मुलगा घसरत धबधब्यावरुन खाली पडतोय की काय असंच सर्वांना वाटत होतं पण तितक्यात इतर पर्यटकांनी आपली शक्कल लढवली. तरुण एका खडकाला पकडून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता अशात उपस्थितांनी साडी आणि काही कपड्यांना एकत्रित करुन एक दोरखंड तयार केला. मुलाच्या दिशेने हा दोरखंड फेकून त्यांनी मुलाला ओढत बाहेर काढले. अनेक प्रयत्नांनंतर मुलाला हळूहळू पाण्यातून बाहेर काढून त्याचा जीव वाचवण्यात आला. जर उपस्थितांनी प्रसंगावधान दाखवत तरुणाची वेळेत मदत केली नसती तर त्याचा जीव जाण्याची दाट शक्यता होती. ही घटना पुन्हा एकदा आपल्याला सावध करते की, डोंगर आणि धबधब्यांजवळ सेल्फी काढणे किती धोकादायक असू शकते.

मलशेज घाट के पास कालू झरने पर एक लड़का सेल्फी लेने गया। पैर फिसला और वो गहरी घाटी की तरफ लुढ़कने लगा। आखिरी पल में एक पत्थर से उसका हाथ अटक गया, वरना सीधा धारा में समा जाता। वहाँ मौजूद लोगों और Tourists ने तुरंत साड़ी और कपड़ों से रस्सी बनाई। खतरे के बीच पहुँचकर उसे सुरक्षित… pic.twitter.com/bC8ZWf7Brx — Mandeep RajBhar (@MandeepRajBhar9) August 7, 2026

शेवटी आईच ती…! पिल्लाच्या भेटीसाठी कासाविस झाली मांजर, भिंतीवरुन खाली कोसळली अन् तिची धडपड पाहून यूजर्स झाले भावूक

घटनेचा हा व्हिडिओ @MandeepRajBhar9 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “तो नशीबवान होता म्हणून नाहीतर फोटोऐवजी एखादी दुःखद बातमी समजली असती”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो निष्काळजीपणाचा क्षण होता… सुदैवाने जीव वाचला”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यावेळी कुटुंबाला काय वाटलं असेल याचा नुसता विचार करूनही माझे हृदय थरथरते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Malshej ghat kalu waterfall youth slips while taking selfie rescued by tourists using saree rope viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
1

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
3

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
4

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.