
PHOTO GENERAT AI
असाच एक व्हिडिओ झोमॅटोच्या एका डिलिव्हरी रायडरने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओ मध्ये त्याने एका विषयावर विचार करण्यास प्रवृत केले. या व्हिडिओमध्ये, तो डिलिव्हरी रायडर एका अशा घटनेबद्दल सांगत आहे, ज्यामुळे अनेकजण संतप्त झाले आहेत. या व्हिडिओ मध्ये तो दिव्यांग असल्याचा दावा करत मदतीची हाक देत आहे.
@Nihir_Rider हा त्याचा इन्स्टाग्राम अकाऊंट वरुन त्याने आपली माहिती शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये, तो रायडर सांगतो की त्याला एका ग्राहकाला जेवणाची ऑर्डर पोहोचवायची होती. तो इमारतीजवळ पोहोचला, पण तिथे लिफ्ट नव्हती. ग्राहकाचे घर दुसऱ्या मजल्यावर होते.पायाच्या अपंगत्वामुळे त्याला पायऱ्या चढणे कठीण जात होते. ही अडचणी असूनही, तो पायऱ्या चढला आणि त्याने जेवण त्या ग्राहकाला पोहोचवले.
ग्राहकाची प्रतिक्रिया ऐकल्यानंतरही, त्या रायडरने आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला.व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “चला प्रयत्न करूया.” त्यानंतर तो हळूहळू दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्या चढतो. ही एक साधी डिलिव्हरी नव्हती, तर हे एक आव्हानात्मक काम होते. त्या रायडरने कसेबसे ग्राहकाच्या दारापर्यंत जेवण पोहोचवले, पण पुढे जे घडले त्यामुळे तो थक्क झाला.
डिलिव्हरी रायडरने असा दावा केला आहे की, ग्राहकाच्या दारावर पोहोचल्यानंतरही त्याची ऑर्डर रद्द करण्यात आली. व्हिडिओमध्ये, त्या ग्राहकाने त्याच्या फोनमधील ऑर्डर रद्द झाल्याचा एक स्क्रीनशॉट दाखवला, ज्यामध्ये ऑर्डर रद्द झाल्याची माहिती मिळाली. ही घटना सांगताना त्याने स्पष्ट केले की, जेवणाची ऑरडर पोहोचवण्यासाठी एवढी मेहनत घेऊनही तो निराश झाला होता.
Bengaluru News : भरदिवसा चालत्या दुचाकीवर तरुणाचा जीवघेणा स्टंट; व्हीलीचा व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, मोठ्या संख्येने इन्स्टाग्राम युजर्स त्या रायडरच्या समर्थनार्थ पुढे आले. लोकांनी म्हटले की, एखाद्याच्या शारीरिक अडचणी समजून घेणे आणि थोडी मदत करणे हे माणुसकीचे लक्षण आहे. पण अनेक वापरकर्त्यांनी रायडरला प्रोत्साहन दिले, तर काहींनी ग्राहकाच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
तथापि, काहींनी व्हिडिओ बनवण्याच्या पद्धतीवर आणि घटनेच्या इतर पैलूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, परिस्थितीचे पूर्ण स्वरूप समजून घेण्यासाठी ग्राहकाचा दृष्टिकोन देखील मांडला पाहिजे.
या घटनेमुळे डिलिव्हरी रायडर्सना दररोज भेडसावणाऱ्या आव्हानांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. वाहतूक कोंडी, हवामान, वेळेची मर्यादा आणि वेगवेगळ्या इमारतींमध्ये डिलिव्हरी करणे हे सर्व त्यांच्या कामाचाच एक भाग झाला आहे.
Viral Video : चार लिफ्ट असूनही मजुराला 21 मजले चढण्याची वेळ, मजुराचा व्हिडिओ चर्चेत