
चुकीचा आरोप अन् व्यक्तीने जीवाची लावली बाजी, कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपवलं आयुष्य; पुन्हा एकदा तो Video झालाय Viral
काय आहे प्रकरण?
केरळमधील ४२ वर्षीय पुरूषाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. मुख्य म्हणजे यामागचे मूळ कारणं सोशल मिडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत व्यक्तीचे नाव दिपक असून ते गोविंदपुरममधील उल्लातोडी हाऊसचे रहिवासी आहे. आरोप करणाऱ्या महिलेने सोशल मिडियावर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात असा दावा करण्यात आला आहे की, दीपकने बसमध्ये प्रवास करताना तिच्यासोबत गैरवर्तन केले.
Kerala Man Dies by Suicide After Bus Harassment Video Accusation Psychologist Shimjitha Musthafa posted an 18-second clip alleging Deepak deliberately touched her with sexual intent during a bus ride to Payyannur, gaining over 2 million views before removal Well played bitch 🤬 pic.twitter.com/wycgaUZWHc — Sumit (@SumitHansd) January 18, 2026
सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे व्हिडिओ २० लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. व्हिडिओ वेगाने पसरल्यानंतर दीपकची ओळख सार्वजनिक झाली आणि त्याच्यावर ऑनलाइन तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. कुटुंबाचे म्हणणे आहे की मानसिक दबावामुळे दीपक पूर्णपणे कोलमडला होता. दीपकच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक रहिवाशांनी महिलेचे आरोप चुकीचे ठरवून व्हिडिओचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा दावा केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिपकवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. परिणामी तो आणखी त्रस्त झाला. रविवारी (१८ जानेवारी २०२६) सकाळी ७ वाजेच्या सुमारास दीपक त्याच्या खोलीतून बाहेर आला नाही. कुटुंबीयांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्याचा मृचदेह छताच्या पंख्याला लटकलेला आढळला.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.