उशीच्या आत लपला होता विषारी साप, उघडून पाहताच फणा काढला बाहेर अन्... थरारक घटनेचा Viral Video
किंग कोब्रा हा सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्याचे विष क्षणार्धात कोणालाही मृत्यूच्या दारी पोहचवू शकते. त्याच्याकडे इतकं विषारी साप आहे की वाघ-सिंह सुद्धा त्याला पाहून दूर पळतात. एवढेच काय तर माणसंही यांच्यापासून चार हाथ लांब असतात. याला पाहताच प्राणीच काय तर माणसंही आपली वाट बदलतात. अशात तुम्ही विचार करा असा हा खतरनाक प्राणी अचानक तुमच्या समोर आला तर तुम्ही काय कराल…
किंग कोब्राचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बऱ्याचदा या व्हिडिओतून त्याच्या सामर्थ्याचे दर्शन घडते. त्यातच आता किंग कोब्राचे आणखीन एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. यात हा कोब्रा चक्क एका घरात घुसून गुपचूप एका उशीत लपल्याचे दिसून येत आहे. तरुणाला काही विचित्र वाटताच तो उशी पकडून त्यात काय आहे म्हणून बघतो आणि तितक्यात त्याला विषारी कोब्राची थरारक दृश्ये दिसू लागतात. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता अनेकजण हा व्हिडिओ पाहून थक्क झाले आहेत.
हेदेखील वाचा – सिंहाच्या कळपाने केली म्हशीची शिकार, दुसरी म्हैस वाचवायला येताच केलं असं काही… चित्तथरारक घटनेचा Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओत नीट पाहीले तर दिसते, एक सोफा आहे यावरील उशीला घेऊन व्यक्ती घाबरत घाबरत एका रॉडच्या मदतीने उघडण्याचा प्रयत्न करत आहे. उशीच्या कव्हर हलकासा उघडून बघताच यात आत कोब्रा बसल्याचे दिसते. व्यक्ती पुढे काय करेल तितक्यात कोब्रा उशीतून बाहेर येत आपला फणा बाहेर काढतो. त्याचे ते रौद्र रूप पाहून आता तो दंश करेल कि काय? असे वाटू लागते. मात्र व्हिडिओ इथेच संपतो. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
माहितीनुसार, या कोब्राने कोणालाही दंश केला नाही. नंतर या कॅब्रल पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. दरम्यान कोब्राचे विष हे प्रचंड वेगानं शरीरात पदरते. शिवाय तो इतर सापांच्या तुलनेत खूप जास्त विष सोडतो त्यामुळे अनेकदा उपचार सुरू होण्याआधीच लोकांचा मृत्यू होतो. असो, पण हा व्हिडीओ पाहून जवळपास सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.
हेदेखील वाचा – तरुणाला जीवघेणी करामत चांगलीच भोवली! काटेरी शस्त्रावर पडला पाय अन् क्षणार्धात… Video Viral
किंग कोब्राचा हा व्हायरल व्हिडिओ @abhisheksandhu1126 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सोफ्याच्या कव्हरमध्ये कोब्रा’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला 1.5 कोटीहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत व्हिडिओवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “नवीन भीती अनलॉक’ तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “उशी माझ्या मांडीवर असताना मी ही रील पाहत होतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.