
जीवघेणा प्रकार! आयुष्य पणाला लावून व्यक्तीने तोंडात फोडला रॉकेट, आगीच्या ज्वाळांनी जळून निघाला चेहरा अन् धक्कादायक Video Viral
दिवाळीच्या सणाने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. नवीन कपडे, दिव्यांची रोषनाई आणि फटाक्यांची मजा लुटत लोक सण साजरा करत आहे. अशातच दिवाळीचे अनेक व्हिडिओज देखील सोशल मिडियावर शेअर केले जात आहेत आणि यातच एक नवीन धक्कादायक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, ज्यात एक तरुण स्वतःचे आयुष्य पणाला लावून जीवघेणा प्रकार करताना दिसून आला. इंटरनेटवर स्वत:ला व्हायरल करण्यासाठी लोक अनेक नको ते प्रकार करताना दिसून येतात आणि असेच काहीसे दृश्य आताच्या व्हिडिओत घडताना दिसून आले. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा घराच्या छतावर उभा असल्याचे दिसून येते. धक्कादायक बाब म्हणजे अवकाशात फोडला जाणारा राॅकेट फटाका त्याने आपल्या तोंडात पकडलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि कदाचित अभिमानाची झलक दिसते. माचीसच्या काडीने तो रॉकेटची वात पेटवतो, ज्यानंतर काही सेकंदातच त्यातून ज्वलंत आग डायरेक्ट त्याच्या तोंडावर जाऊन पडते. फटाका अवकाशात जाऊन उडतो खरा पण त्याआधी त्यातील ज्वलंत ज्वाळा मुलाच्या चेहऱ्यावर जाऊन पडतात, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्याला निश्चितच इजा झाली असावी. फटाका उडून गेल्यानंतर मुलाच्या चेहऱ्यावर काळे डाग पडल्याचे दिसून येतात. मुलाला फार काही झालं नसलं तरी असे जीवघेणे प्रकार आपल्या जीवासोबत करणं आपल्यासाठी घातक ठरु शकतं. हे प्रकार फक्त आपल्याच नाही तर इतरांच्याही जीवीला धोका निर्माण करतात.
Dhruv Rathee : Celebrate Diwali safely Andh Bhakt : How dare you say that, my ego is hurt now, see what I do… pic.twitter.com/PVx0eVGjlQ — Veena Jain (@Vtxt21) October 25, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @Vtxt21 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अशी मुले कधी शुद्धीवर येतील हे मला माहित नाही. हे लोक अशा विचित्र गोष्टी करतात पण त्यांच्या पालकांनी काय अनुभवले असेल याचा ते कधी विचार करतात का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा वेडेपणा कधी समजेल, काय माहित” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काय विचार करून ते असं करतात काय माहित”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.