(फोटो सौजन्य: Instagram)
लहान मुलांना सांभाळण म्हणजे आई-वडिलांना घाम फुटलाच समजा. थोड्या वेळासाठी जरी आपली नजर त्यांच्यावरुन हटली तर अनर्थ घडून येऊ शकतो. मुलांना सांभाळताना खबरदारी घेतली नाही तर ते कधी काय करुन बसतील याचा नेम नाही. अशातच नुकताच सोशल मिडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक बाळ इमारतीवरुन खाली कोसळताना दिसून आलं. व्हिडिओच्या मागे त्याची आई मोठ्या आवाजात किंचाळताना दिसली पण शेवटी जे घडलं त्याने सर्वांना हादरवून सोडलं. चला या घटनेत पुढे काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या घटनेत एक अनोखा चमत्कार घडून आला ज्याचा कोणी विचारही केला नसेल. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, एक माणूस रस्त्याच्या कडेने हातात काॅफी घेऊन त्याच्या गंतव्यस्थापर्यंत जाताना दिसून येतो. पण याचवेळी त्याला अचानक एका महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागतो. हा आवाज कुठून येत आहे, हे तपासण्यासाठी जेव्हा तो डोक वर करुन पाहतो तर त्याला वरुन एक बाळ त्याच्या दिशेने खाली पडत असल्याचे दिसते. व्यक्ती घाबरतो पण दुसऱ्याच क्षणी कोणताही वेळ वाया न घालवात तो लगेच आपल्या हातातील काॅफी जमिनीवर फेकून बाळाला पकडण्यासाठी हात पुढे करतो. सुदैवाने हे बाळ बरोबर त्याच्या हातातच येऊन पडते, ज्यानंतर तो वर पाहून काहीतरी बोलताना दिसून येतो. आता ही घटना खरी आहे की एडिटिंगची कमाल याविषयी यूजर्सच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह आहेत. तथापि याचा व्हिडिओ मात्र सोशल मिडियावर धुमाकूळ माजवत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @spicy.xpress नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये सदर घटना ही चीनमधील हाँगकाँग येथे घडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याला एक काॅफी खरेदी करुन द्या” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला प्रश्न आहे की हे एआय असावं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे एआय वाटत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






