मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! स्कुटावर आला हृदयविकाराचा झटका तितक्यात देवदूत ... धकाकदायक Video Viral
आजकाल कोणच्याही जीवाची शाश्वती देता येत नाही. या जगाचा निरोप घेऊन कोणी कधी या जगातून निघून जाईल याबद्दल काहीच सांगता येत नाही. सध्या मृत्यूचे प्रमाण फार वाढले आहे. सोशल मीडियावर अशा घटनांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. सध्या मृत्यूच्या दारातून परतनाऱ्या एका व्यक्तीचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत.
काय आहे प्रकरण?
दिवसेंदिवस हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सीपीआर दिल्याने अनेकांचा श्वास परत येतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात पाहायला मिळाला. याचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी सकाळी एका उपनिरीक्षकाने (एसआय) आपल्या बुद्धीने एका व्यक्तीचे प्राण वाचवले. त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. दरम्यान, एसआय विनोद कुमार सिंह देवदूताच्या रूपात तेथे पोहोचले आणि त्यांनी सीपीआर देऊन त्या व्यक्तीचे प्राण वाचवले.
हेदेखील वाचा – Video Viral: कुटुंबीय येताच प्रेयसीने प्रियकराला लपवले पेटीत, काही वेळाने पेटी उघडली अन्… पाहून सर्वांनाच बसला धक्का
देवरियाच्या पोलीस लाईनजवळील स्टेडियमबाहेर सदर घटना घडली आहे. इथे लोक रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत होते. दरम्यान, स्कूटरच्या मागच्या सीटवर बसून एक व्यक्ती कुठेतरी जात होती. अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा तोल जात ते स्कूटरवरून खाली रस्त्यावर पडू लागले. मॉर्निंग वॉकला निघालेले डायल 112 चे प्रभारी उपनिरीक्षक विनोद कुमार सिंग यांची त्या व्यक्तीवर सुदैवाने नजर पडली. त्यांनी तात्काळ स्कूटरस्वाराला कार थांबवण्यासाठी हाक मारली. तोपर्यंत ती व्यक्ती रस्त्यावर पडली होती. यानंतर इन्स्पेक्टरने वेळ न दवडता त्या व्यक्तीला सीपीआर देण्यास सुरुवात केली. सुमारे 5 मिनिटे सतत सीपीआर दिल्यानंतर त्या व्यक्तीला शुद्धी आली.
देवरिया के PRV 112 प्रभारी व उपनिरीक्षक श्री विनोद कुमार सिंह को साधुवाद, मेरी विधानसभा के श्रीराम आशीष यादव जी को हार्ट अटैक के उपरांत तत्काल CPR देकर उनकी जान बचाने के लिए, श्रीराम आशीष यादव मॉर्निंग वॉक पर निकले थे,उसी दौरान उन्हें हार्ट अटैक हुआ, कोई कुछ कर पाता इससे पूर्व ही… pic.twitter.com/G1Ec0lRDR7
— Dr. Shalabh Mani Tripathi (@shalabhmani) October 19, 2024
त्यानंतर त्या व्यक्तीने इन्स्पेक्टरशी आपली ओळख करून दिली आणि त्याचे नाव राम आशिष यादव असून तो लक्ष्मी नारायण मंदिराचा रहिवासी असल्याचे सांगितले. शुद्धीवर आल्यानंतर त्या व्यक्तीला मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक एसआय विनोद कुमार यांची मन भरून प्रशंसा करत आहेत.
हेदेखील वाचा – धक्कादायक! रस्त्याच्या कडेला झोपलेल्या माणसाला काठी तुटेपर्यंत मारले, Viral Video पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल
या घटनेचा व्हिडिओ @Dr. Shalabh Mani Tripathi नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी घटनेविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत देखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “इन्स्पेक्टर विनोद कुमार सिंग यांचे खूप खूप आभार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अतिशय कौतुकास्पद काम”.