आपण कितीही लपवलं तरी गोष्टी लपून राहत नाहीत. याचा अनुभव तुम्हीही कधीना कधी घेतलाच असेल. कधी कधी आपल्या मजा मोठ्या शिक्षेत बदलते. असाच काहीसा प्रकार आजच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये घडल्याचे दिसून येत आहे. एक प्रियकर त्याच्या प्रेयसीला गुपचूप भेटायला गेला, तिच्या घरच्यांना याची माहिती मिळाली आणि मग प्रेयसीने प्रियकराला अशा ठिकाणी लपवून ठेवले की पाहून घरच्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अनेकदा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड एकमेकांच्या प्रेमात असताना ते गुपचूप भेटतात. पण कधी कधी प्रेम मर्यादेपलीकडे जाते आणि मग बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड अशी पावले उचलतात ज्यामुळे त्यांना नंतर त्रास होतो. असाच काहीसा प्रकार व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत झाल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओतील दृश्य तुम्हाला थक्क करून टाकतील.
हेदेखील वाचा – धक्कादायक! रस्त्याच्या कडेला झोपलेल्या माणसाला काठी तुटेपर्यंत मारले, Viral Video पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल
काय आहे प्रकरण?
एक प्रियकर आपल्या गर्लफ्रेंडला तिच्या घरी भेटायला गेला होता. मात्र याच दरम्यान मुलीच्या घरच्यांना तिचा प्रियकर घरी आल्याची माहिती मिळते. मुलीचे कुटुंबीय तिच्या प्रियकराला पकडण्यासाठी तिच्या खोलीत येतात. पण नंतर मुलीचा प्रियकर खोलीत ठेवलेल्या बॉक्समध्ये जाऊन लपतो आणि मुलगी त्या बॉक्सला बंद करून टाकते. यानंतर घरातील सदस्य खोलीत जमा होतात आणि त्याचा शोध सुरू करतात. काही वेळाने मुलगी बॉक्स उघडते. तर बॉक्समधून तिचा प्रियकर बाहेर येतो. मात्र बॉक्समध्ये त्याची झालेली अवस्था पाहून सर्वच अचंबित होतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच
धुमाकूळ घालत आहे.
प्रेमिका ने प्रेमी को बक्से मे किया बंद…l pic.twitter.com/q3zm9YY0cG
— Viral Vibes (@Viralvibes07) October 17, 2024
हेदेखील वाचा – लज्जास्पद! मेट्रो स्थानकावर तरुणाने प्रवाशांसमोर उघडली पँटची चेन अन्… Video Viral
घटनेचा व्हायरल व्हिडिओ @Viralvibes07 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘प्रेयसीने प्रियकराला बॉक्समध्ये बंद केले…l’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिले असून व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिला आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अजब प्रेमाची गजब कथा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खूप भयानक आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काय काय बघावं लागत आहे”.