नाद केला पण वाया गेला! माकडांना मारण्यासाठी गेला अन् स्वतःचाच गेम करून बसला; व्यक्तीच्या फजितीचा मजेदार Video Viral
मानव आणि प्राणी हे दोन्हीही सजीव प्राणी असले तरी त्यांच्या स्वभावात बरीच तफावत आहे. मानव आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेकदा प्राण्यांचे स्पर्धा करू पाहतात त्यांना कमी लेखू पाहतात पण काही क्षण असेही येतात ज्यात प्राणी मानसनाच्या वरचढ ठरतात. माकड हा मुळातच मस्तीखोर प्राणी आहे अशात त्याच्याशी पंगा घेणं महागात पडू शकत. माकडाला एखादी गोष्ट शिकवण म्हणजे स्वतःला वेडं करण्यासारखं आहे पण ही गोष्ट व्हिडिओतील व्यक्तीला कोण समजवणार? आता माकडाला अद्दल घडवायची म्हणून व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला खरा पण यात शेवटी त्याचीच फजिती झाली. माकडाला मारायला गेलेल्या व्यक्तीला स्वतःच माकडाचा मार खावा लागला आणि हे सगळं कसं घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
तुम्ही लहानपणी माकड आणि टोपीवाल्याची कथा नक्कीच ऐकली असेल. या कथेत जसा माकड टोपीवाल्याची नक्कल करतो अगदी तशीच नक्कल व्हिडिओतील माकड देखील व्यक्तीबरोबर करू पाहतो. पण कथेत जसा टोपीवाल्याला माकडाच्या नक्कलचा फायदा होतो तसा फायदा व्हिडिओतील व्यक्तीला होत नाही तर उलट या नक्कलचा परिणाम म्हणून त्याला माकडाच्या हातून मर खावा लागतो. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक माणूस हातात काठी घेऊन माकडाला मारण्यासाठी त्याच्या मागे पळताना दिसून येतो. पण पुढच्याच क्षणी हे दृश्य बदलते आणि उलट माकडचं व्यक्तीला मारण्यासाठी त्याच्या मागे पळू लागतो. माकडाने उंच झेप घेत व्यक्तीवर हल्ला केला आणि त्याला थेट जमीनदोस्तच केलं. स्वतःच्या ताकदीचा माज करत जो व्यक्ती माकडाला मारायला निघाला होता त्यानेच व्हिडिओच्या अखेरीस मार खाल्ला जे पाहून युजर्सना हसू अनावर झालं. आपलाच डाव आपल्यावर कसा पलटू शकतो याचे उत्तम उदाहरण या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान, माहितीनुसार ही घटना उत्तर प्रदेशमधील वृंदावन येथे घडून आली आहे.
ख़ुद को होशियार समझकर चला था वृंदावन के बंदरों से WWF लड़ने… 10 सेकंड में बंदरों ने मैच खत्म कर दिया😂 pic.twitter.com/DpgFhGBpBZ
— Ankit Rawal (@ankitrawal1182) August 10, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @ankitrawal1182 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जास्त हुशारी चांगली नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वृंदावनाच्या माकड रोज WWE फाइट पाहत असेल आणि तो नक्कीच जॉन सिन्हाचा फॅन असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे एवढी मजा तर WWE फाईटमध्येही येत नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.