
बाईईई हा काय प्रकार? म्हशीच्या वर दुसरी म्हैस अन् त्यावर बसून माणूस करतोय सफर... पाहून सर्वच पडले गोंधळात; Video Viral
सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय दिसून येईल त्याचा नेम नाही. अनेक थक्क करणारे, आश्चर्याचा धक्का देणारे आणि आपल्याला अचंबित करणारे व्हिडिओज इथे शेअर होत असतात. इंटरनेटच्या दुनियेत असाच एक नवीन प्रकार व्हायरल झाला आहे, ज्यातील दृश्ये तुमच्या पायाखालची जमीन हादरवतील. व्हिडिओतील दृश्ये इतके अजब आहेत की पाहून कुणीही गोंधळून जाईल. वास्तविक या व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक अनोखा प्रकार घडून येताना दिसला ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. आता या व्हिडिओत असं नक्की काय घडून आलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
म्हशींच्या कळपात सिंहाने टाकला डाका! धावत पळत पकडली मान, जमिनीवर लोळवत केली शिकार; थरारक Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात मोकळ्या रस्त्यावर एक माणूस आपल्या सफरचा आनंद घेताना दिसून आला. परंतु त्याची ही सफर तो कोणत्या गाडीवर बसून नाही तर दोन म्हशींवर बसून करताना दिसून आला. व्हिडिओमध्ये एक मोठी म्हैस, त्यावर आणखीन एक म्हैस आणि त्यावर बसलेला माणूस हे अजब गजब कॉम्बिनेशन पाहायला मिळाले. मुख्य म्हणजे कुणाचाही तोल यावेळी ढासळत नव्हता आणि मजा लुटतच सर्व या प्रवासाचा आनंद लुटत होते. ही दृश्ये काही सामान्य नसून हे नक्की सत्य आहे की एआय असा प्रश्न आता युजर्स करत आहेत. ही दृश्ये एका कारमधून मोबाईलच्या कॅमेरात कैद करण्यात आल्याचे समजून येत आहे. व्हिडिओतील दृश्ये खरोखर अजब असून याच्या सत्यतेबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
हा व्हायरल व्हिडिओ @bukhulk_vlog नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत करोडो व्युज मिळाल्या असून 2 लाखाहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत. तसेच काही युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “टेक्नॉलॉजीया ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे की एआय?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “लोक कधी काय करतील त्याचा नेम नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.