अंधाऱ्या राती रस्त्यावर फिरतोय मानकाप्या, मागे लागून करतोय पाठलाग... पाहून सर्वांची उडाली घाबरगुंडी; Video Viral
भुतांच्या अनेक कथा तुम्ही आजवर ऐकल्या असतील. भुताटकीच्या गोष्टी म्हणजे लोकांची आवडीची बाब. यातीलच एक लोकप्रिय पात्र म्हणजे मानकाप्या. हा एक असं भूत आहे ज्याला डोकं नाही, त्याची मान कोणीतरी कापलेली असते ज्यामुळे त्याला मानकाप्या असं म्हटलं जात. हा मानकाप्या फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्येही फार लोकप्रिय आहे. हॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट हॅरी पॉटरमध्येही “सर नेकलेस” दाखवण्यात आले. एकदंरीतच आपण या मानकाप्याविषयी ऐकले किंवा चित्रपटांमध्येही पाहिले आहे पण तुम्ही कधी याला खऱ्या आयुष्यात पाहिले आहे का? इंटरनेटवर सध्या खऱ्याखुऱ्या मानकाप्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्याने एका गावामध्ये उच्छाद मांडून ठेवला आहे.
काय दिसलं व्हिडिओत?
ही घटना राजस्थानमध्ये घडून आली असून राजस्थानच्या टोंक गावात मानकाप्या गावकऱ्यांच्या मागे फिरताना दिसून आला. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात रस्त्यावर एक डोकं नसलेला माणूस लोकांमागे पळताना दिसून येतो. लोक त्याला पाहून घाबरलेले असतात आणि त्याच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी इकडून तिकडून पळापळी करत असतात. मानकाप्याचं डोकं पोटाला चिपकलेलं असत आणि तो गावकऱ्यांच्या मागे पळत त्यांना घाबरवत असत. वास्तविक, हा सर्व प्रकार एक प्रँक असतो. काही तरुणांनी मिळून मानकाप्याचा वेश परिधान केलेला असतो. तरुणांच्या या प्रँकमध्ये फक्त गावकरीच नाही तर युजर्सही फसले. सोशल मीडियावर अनेकांना व्हिडिओतील दृश्ये पाहून धडकी भरली आणि हा खरोखरचा मानकाप्या आहे असेच लोकांना वाटू लागले.
वीडियो राजस्थान के टोंक जिले का बताया जा रहा है.
हालांकि विडियो प्रेंक के तौर पर है लेकिन कमजोर दिल वालो के लिए जानलेवा साबित भी हो सकता है.
मेरा @RajPoliceHelp से निवेदन रहेगा इस तरह की हरकते या प्रेंक करने वालो पर कानूनी कार्यवाही कीजिए ,ताकि आमजन में निर्भय का माहौल बना रहे. pic.twitter.com/LmBUVKoT8i — jasraj singh rajpurohit (@js_rajpurohit10) October 17, 2025
रीलच्या नादात जीव टाकला धोक्यात, महिलेने साडीलाच लावली आग अन् घरभर पळत सुटली अन् Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @js_rajpurohit10 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अशा खोड्यांमुळे रायडरचा तोल बिघडू शकतो, ज्यामुळे अपघात होऊ शकतात. जर एखादा डंपर किंवा ट्रक रायडरच्या समोरून जात असेल, तर असंतुलनामुळे तो त्याखाली येऊन चिरडला जाऊ शकतो, ज्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता हेच करणं बाकी होत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.