(फोटो सौजन्य: X)
दिवाळीच्या सणाची सध्या सर्वत्र रोषणाई उजळलेली दिसून येत आहे. लोक दिव्यांसोबत फोटो काढत आहेत, काही फटाके फोडताना रील बनवत आहेत तर काही नवीन कपडे घालून रील बनवत आहेत. आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण सोशल मीडियावर शेअर करणे आजकाल ट्रेंडच बनले आहे आणि अनेक लोक या ट्रेंडमध्ये सामीलही होत आहेत. रील बनवताना अनेकजण भान हरपून बसतात आणि मग नको ते घडून बसते. सध्या एका महिलेची रील इंटरनेटवर फार वेगाने शेअर केली जात आहे. यात महिलेच्या साडीला भीषण आग लागल्याचे दिसते. मुख्य म्हणजे ही आग पुढे इतकी वाढते की महिलेला तिची संपूर्ण साडी सोडावी लागते. व्हिडिओत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
रील्स व्हायरल करण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या प्रयत्नात, लोक धोकादायक आणि मूर्ख वर्तन करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ असेच काहीसे दाखवतो. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला आपला जीव धोक्यात घालून रील बनवत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की तिने प्रथम तिच्या साडीला आग लावली आहे आणि नंतर स्वतःला वाचवण्यासाठी धावत हळू हळू साडी काढू लागली. जवळच तिची मुलगी हा सर्व प्रकार बघून हसत असते आणि शेवटी ती महिला देखील हसू लागते. आग जास्त भडकली नसल्याने महिलेचा जीव वाचतो पण एका शुल्लक रीलसाठी स्वतःच्या जीवाचा खेळ मांडणे कितपत योग्य आहे हा प्रश्न अजूनही तसाच राहतो.
“जब आप तय कर लें कि रील बनेगी, चाहे लाइफ रहे या न रहे! 🤯”आपको क्या लगता है रील जरूरी है या जीवन (कृपया इसे नकल करने की कोशिश न करें) pic.twitter.com/Qi9S3g3JVY — Mahesh Chandra Bhatt (@maheshb20727795) October 17, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @maheshb20727795 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल असे काहीही करू नये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लोक आता प्रसिद्ध होण्यासाठी काय काय करत आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आजच्या समाजात, लोक रील्स बनवण्याच्या मागे पागल झाले आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.