वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्सवर @JtrahulSaini या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला शेअर करत सांगितले आहे की, मेरठमध्ये महिला दरोगाने ट्राफिकमध्ये अडकलेल्या नागरिकांवर अरेरावी केली आहे. नागरिकांशी अपमानजनक आणि अपशब्दांचा वापर करत गैरवर्तन केले आहे. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला वर्दीमध्ये असताना एका व्यक्तीशी भांडताना दिसत आहे. सध्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, महिलेने वर्दीचा माज दाखवत तरुणाला धमकी देखील दिली आहे. तिने त्याला मी वर्दीत आहे, तुझ्या तोंडात… असे काही अपशब्द बोलले आहे. महिलेचा हे वर्तन पाहून अनेकजण थक्क झाले आहे.
व्हायरल व्हिडिओ
“मुंह में म्यूट दूंगी अभी…ये बोल यूपी पुलिस की महिला सब इंस्पेक्टर के हैं..! सामने वाला बेचारा युवक शालीनता से बात करते हुए सफाई दे रहा है…लेकिन मैडम सर पर बैठना चाहती है…! शुक्र है बेचारा युवक मैडम के तिलस्मी कहर से बच गया नहीं तो पता न क्या होता..! 📍मेरठ (यूपी) pic.twitter.com/SvDYaYMSnr — Rahul Saini (@JtrahulSaini) December 29, 2025
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर महिला दरोगाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने, अहंकार कायद्याचे उल्लंघन करवतो असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने या पोलिसांनी दादरिगीचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न केला आहे. आणकी काहींनी अशा लोकांची भरती कशी करुन घेतता, यांच्याविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे असे म्हटले आहे. एकाने हे लोक स्वत:ला कायद्यापेक्षा जास्त मोठे समजतात असे म्हटले आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






