(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
सदर घटना ही कर्नाटकातील चन्नपट्टणा येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. ८५ वर्षीय पार्वतीम्मा यांचे निधन झाले आणि त्यांच्या जाण्याने फक्त कुटुंबियांनाच नाही तर माकडालाही अश्रू अनावर झाले. पार्वतीम्मा यांनी आपला बराच काळ माकडांना समर्पित केला होता. त्या रोज माकडांना जेवण खाऊ घालायच्या आणि मायेने एका मुलाप्रमाणे त्यांना कुरवाळच्या. त्यांचे हेच प्रेम मुक्या प्राण्यानेही विसरले नाही तर अखेरचा निरोप घेण्यासाठी तो अखेर त्यांच्या शवाजवळ पोहचला. जेव्हा पार्वतीम्माचा मृतदेह घराच्या अंगणात ठेवण्यात आला, तेव्हा घरात शांतता पसरली. मग, गर्दीतून वाट काढत एक वानर आत शिरला. त्याने कोणताही आवाज केला नाही किंवा कोणतेही अन्न हिसकावून घेतले नाही. त्याने पार्वतीम्माला जमिनीवर ठेवल्याचं पाहताच तिच्याजवळ धाव घेतली आणि तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत तो तिला उठण्याची विनवणी करु लागला. माकडाने तिला मिठी मारली, आपले डोके तिच्या मानेवर ठेवले. यावेळी त्याची मनातील दु:खद भावना स्पष्टपणे दिसून येत होत्या.
प्राण्यांची ही अढळ निष्ठा क्वचितच कधी अशी पाहता येते ज्यामुळे व्हिडिओ शेअर होताच लोकांनी त्याला वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली. माकडाच्या दु:खाने सर्वांनाच भावूक केलं असून या घटेनचा व्हिडिओ @zindagi.gulzar.h नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांचे म्हणणे आहे की, माणसे काळाच्या ओघात उपकार विसरू शकतात, पण हे प्राणी आपल्या मृत्यूपर्यंत प्रेमाचे ऋण फेडत राहतात. त्या माकडाने महिलेच्या प्रेमाची परतफेड केली आणि शेवटचा निरोप द्यायला तो तिथे उपस्थित राहिला. घटनेचे हे दृष्य फारच अनोखे आणि थक्क करणारे असल्याने व्हिडिओने क्षणातच लोकांचे लक्ष वेधले तर दृष्यांनी लोकांनी भावूक देखील केले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






