funny video monkey opens young man's bag and starts throwing all belongings video viral
सोशल मीडियावर रोज भन्नाट भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे धावपळीच्या स्पर्धेच्या काळात माणूस अतिशय थकून जातो. अशा वेळी माणूस शातंता शोधण्यासाठी निघतो. एखाद्या ताज्या हवेशीर ठिकाणी फिरायला जातो, कोणी बर्फाळ भागात थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाते, तर कोणी ट्रेकिंगचा अनुभव घेतो. याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.
तुम्ही पर्यटनाच्या प्रत्येक ठिकाणी माकडा हा सामान्य प्राणी पाहिलाच असले. अनेकदा ही माकडे अशी काही खोडी काढतात की हसून हसून पोट दुखून येते. मानवाप्रमाणेच अगदी माकडे देखील खोडकर असते. माकडे संधी मिळताच लोकांना त्रास देतात. मंदिरामध्ये जाताना माणसांचे फोन चोरने, कधी त्यांचे सामान चोरणे अशा प्रकारच्या घटना तुम्ही पाहिल्या असतील. सध्या असाच एक माकडाचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @mr_manish_kharte_05 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एका माकडाने ट्रेंकिगला गेलेल्या एका तरुणासोबत असे काही केलं आहे की, सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक तरुण ट्रेकिंग करत आहे किल्ल्याची टेकडीवर चढत आहे. याशिवाय इतर अनेक माणसे देखील आहे. याच वेळी एका माकडाने तरुणाला थांबवले आहे. यावेळी माकड असे काही केले आहे की, तरुण केवळ पाहत राहिला आहे. माकड तरुणाची बॅग उघडतो आणि त्यातील सर्व कपडे खाली फेकायला सुरुवात करतो. कदाचित माकडाला तरुणाच्या बॅगेत खायला काहीतरी मिळेल असे वाटले असले यामुळे त्याने तरुणाचे कपडे बॅगेतून फेकले असावेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, ही तर सरळ सरळ दादागिरी आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने, हा तर डॉन निघाला असे म्हटले आहे. तर अनेकांनी हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
आईच्या कुशीत जाऊन झोपला छोटा गजराज; दृश्य इतके मनमोहक की पाहून नजरचं हटणार नाही; Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.