(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी मनोरंजक गोष्टी शेअर केले जातात तर कधी हास्यास्पद तर कधी काही मनमोहक दृश्ये शेअर केली जातात. इथे बऱ्याचदा प्राण्यांचे व्हिडिओज देखील शेअर केले जातात. आई आणि मुलाचं नातं हे फार वेगळं असत. हे अनोखं नातं फक्त माणसांपुरतंच मर्यादित नसून प्राण्यांमध्येही आईचा लळा तेवढाच दिसून येतो. आता हेच पाहा ना चिमुकला वाघ पर्यटकांना पाहताच त्यांच्याजवळ जाण्याचा विचार करतो पण आई मात्र काळजीने त्याला मागे ओढते. हे दृश्य दर्शवते की कुठेही जा पण सगळीकडे आईचे आपल्या मुलासाठी असलेले प्रेम, माया आणि काळजी ही सारखीच असते. व्हिडिओत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
Quiz : डोकं चालवा-कोड सोडवा; बुद्धीला द्या जोर… लढवा शक्कल अन् चालवा तुमची अक्कल
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, एका प्राणी संग्रहालयातील दृश्य दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला दबक्या पावलांनी एक वाघ पुढे येत असल्याचे दिसते. त्याला समोर पर्यटकांचा घोळखा दिसला असावा ज्याला जवळून पाहण्यासाठी तो पुढे पुढे येतो पण तितक्यात मागून त्याची आई येते आणि त्याला पर्यटाकांजवळ जाताना पाहून काळजीने आई त्याला रोखते आणि आपल्या तोंडात पकडत त्याला पुन्हा मागे आतमध्ये घेऊन जाते. व्हिडिओमध्ये वाघाचे पिल्लू रांगत कुंपणातून बाहेर पडताना स्पष्टपणे दिसत आहे. तो चालण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर हळूहळू प्राणीसंग्रहालयात आलेल्या लोकांकडे जातो. तेव्हा त्याची आई, जी एक मोठी वाघिणी आहे, अचानक मागून येते. तिच्या डोळ्यात राग आणि काळजी दोन्ही स्पष्ट दिसत आहेत. ती विलंब न करता तिच्या मुलाला तोंडात उचलते आणि त्याला परत घेऊन जाते. हे दृश्य खूप भावनिक आहे आणि लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओत आईची काळजी आणि मुलाप्रतीचे प्रेम स्पष्टपणे दिसून येते तर यात चिमुकल्या वाघाचा भाबडेपणाही दिसतो जो लोकांना फारच प्रेमात पाडतो.
हा व्हायरल व्हिडिओ @tv1indialive नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिला माहित आहे की माणसे तिच्यापेक्षा जास्त धोकादायक आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कारण आईला माणसांचे वास्तव माहित असते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, ‘आईची जबरदस्त एंट्री तर पाहा, तिच्या डोळ्यात राग भरलेला होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.