आई ही आईच असते! बाळाला वाचवण्यासाठी वाघाशी भिडले अस्वल, वाघाशी कशी पाळताभुई एक झाली ते पहाच
वाघ हा आपल्या शिकारीसाठी ओळखला जातो. त्याच्या चपळ आणि धूर्तपणामुळे जंगलातील सर्व प्राणी त्याला घाबरून असतात. अहो प्राणीच काय तर माणसंही वाघापासून चार पाऊले मागेच असतात. वाघाला नुसते पाहिले जरी सर्वजण तेथून पळू लागतात. त्याचा दरारा संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे, तो सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. वाघाला पाहून पाळणाऱ्या अनेकांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल मात्र तुम्ही कधी वाघालाच घाबरून पळताना पाहिले आहे का? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत एका अस्वलाने वाघाची हवा टाइट केल्याचे दिसून येत आहे. खरंतर वाघ अस्वलाच्या लहान मुलाच्या शिकारीसाठी आलेला असतो. तो त्या चिमुकल्या प्राण्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतो मात्र तितक्यात त्याची आई त्याच्या मदतीसाठी धावते आणि वाघावर हल्ला करते. यावेळी वाघही मागे हटत नाही आणि दोघांमध्ये लढत सुरु होते. मात्र अस्वलाचा प्रहार वाघावर भारी पडतो आणि आपण पराभूत होत असल्याचे पाहून वाघ तिथून उलटे पाऊल घेऊन पळू लागतो.
हेदेखील वाचा – हेच ते प्रेम का? भररस्त्यात प्रियकराने केली प्रेयसीला मारहाण, Video Viral
विशेष म्हणजे, वाघ जेव्हा पळू लागतो तेव्हा अस्वलदेखील त्याच्या मागे पळून त्याला भुईसपाट करण्याचा प्रयत्न करतो मात्र वाघ घाबरून वेगाने पाळतो आणि जंगलात नाहीसा होऊन जातो. ही घटना चंद्रपूरमधील ताडोबा राष्ट्रीय उद्यानात घडली आहे. हा व्हिडिओ पाहून आईच्या कणखरपणाचे दर्शन होत. आपल्या पिल्लाला वाचवण्यसाठी आई वाघाशीही लढू शकते. ती आपल्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करू शकते याचे उत्तम उदारहरण आजच्या या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळाले.
हेदेखील वाचा – 15 रुपये हॉस्टेलची फी, 4 रुपये विजेचे बिल अन् फस्ट क्लास सर्व्हिस, AIIMS मधील विद्यार्थ्यांची खोली पाहून अचंबित व्हाल
हा व्हिडिओ @thinklight_jalpa आणि @madhurnangia_photography नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील अस्वलाचे धैर्य पाहून आता अनेकजण आवाक् झाले. वाघ आणि अस्वलातील हा थरार पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाफेखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “निष्कर्ष: आईशी कधीही गोंधळ करू नका” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आपल्या मुलाला वाचवण्यासाठी लढत आहे, आई देव आहे”.