झारखंडमधील देवघर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मधून एमबीबीएस करत असलेल्या एका विद्यार्थ्याने आपल्या कॅम्पसमधील हॉस्टेलची खोली व्हिडिओद्वारे दाखवली आहे. त्याने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताच आता हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 45 सेकंदांच्या या व्हिडिओचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हिडिओमध्ये, विद्यार्थ्याने असा दावा केला आहे की एम्स देवघरमधून एमबीबीएस करण्यासाठी त्याची एकूण फी 5,856 रुपये आहे आणि तो त्याच्या सिंगल-ऑक्यूपेंसी हॉस्टेल रूमसाठी त्याला फक्त 15 खर्च करावे लागतात. विद्यार्थ्याने व्हिडिओमध्ये हॉस्टेलच्या आत उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा देखील दाखवण्यात आल्या आहेत. व्हिडिओतील त्याला कमी पैशात मिळत असलेल्या सोई-सुविधा पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत.
हेदेखील वाचा – वय गेलं पण उत्साह अजून तसाच! आजोबांची दमदार बॅटिंग पाहून धोनीचा हेलिकॉप्टर शॉटही वाटेल फिका, पाहा Viral Video
व्हिडिओमध्ये खोलीच्या एका बाजूला त्याचा पलंग आहे, ड्रॉवरसह अभ्यासाचे टेबल आहे, टेबलासोबत एक आरामदायी फिरणारी खुर्ची आणि वॉर्डरोब देखील आहे. विद्यार्थ्याने असेही सांगितले की, हॉस्टेलमध्ये वीज सतत उपलब्ध असते. ज्यांचे मासिक बिल फक्त 4 रुपये आहे. खोलीच्या बाल्कनीतून सूर्योदयाचे विहंगम दृश्यही विद्यार्थ्याने व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांना आता या हॉस्टेलची भुरळ पडली आहे.
🚨 AIIMS Deoghar room tour in Jharkhand. pic.twitter.com/NdCp5j38xx
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) September 24, 2024
हॉस्टेल रूमचा हा व्हायरल व्हिडिओ @Indian Tech & Infra नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, झारखंडमधील एम्स देवघर खोलीचा टूर असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या कमेंट्सही येऊ लागल्या. ज्यामध्ये एम्सच्या आणखी एका विद्यार्थ्याने त्याचे वसतिगृह जीवन आणि वसतिगृहात उपलब्ध सुविधांबद्दल सांगितले.
हेदेखील वाचा – काटेरी जीभ बाहेर काढताना दिसला एक भयावह जीव, Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल
विद्यार्थ्याने सांगितले, “जर तुम्ही AIIMS मध्ये सामील झालात, तर तुमचे लोक इतके अभिनंदन करतील की तुम्हाला अभिनंदन घेताना कंटाळा येईल. ज्या संस्थेत सरकार प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थ्यावर 1.7 कोटी रुपये खर्च करते त्या संस्थेचा भाग कोणाला व्हायला आवडणार नाही? तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आमचे वर्ल्ड क्लास विद्यार्थी जागतिक दर्जाच्या सुविधांसाठी पात्र आहेत. धन्यवाद, भारत सरकार.”