Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्गाचा चमत्कार जणू! खाली समुद्र आणि वरती तलाव, दृष्ये पाहून यूजर्सना विश्वास बसेना; Video Viral

Sea And Lake At Same Place : एकाच बेटावर तलाव आणि त्याच्याखाली वाहतोय अथांग समुद्र, बाजूने पक्ष्यांचा थवा तर वातावरणात गारवा. नैसर्गिक साैंदर्याने तुडुंब भरलेले हे ठिकाण काल्पनिक नसून वास्तवात ते कुठे वसले आहे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 22, 2026 | 03:18 PM
निसर्गाचा चमत्कार जणू! खाली समुद्र आणि वरती तलाव, दृष्ये पाहून यूजर्सना विश्वास बसेना; Video Viral

निसर्गाचा चमत्कार जणू! खाली समुद्र आणि वरती तलाव, दृष्ये पाहून यूजर्सना विश्वास बसेना; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका अनोख्या बेटावरील नैसर्गिक रचना पाहून पर्यटक थक्क झाले आहेत.
  • अथांग समुद्राच्या वर उंचावर पाण्याचा अद्भूत नजारा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • शांत वातावरण, धबधब्यासारखे वाहणारे पाणी आणि रोमांचक दृश्यांनी हे ठिकाण चर्चेत आले आहे.
अनेकांना फिरायला, सुंदर एक्सप्लोर करायला आणि ठिकाणांचे हे साैंदर्य आपल्या कॅमेरात कैद करायला फार आवडते. सोशल मिडियावर पर्यटनासंबंधित अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. अशात अलिकडेच एका सुंदर आणि अनोख्या ठिकाणाचे दृष्य इंटरनेटवर शेअर करण्यात आले आहे जे वेगाने व्हायरल होत आहे. आपण तलाव पाहिला असेल, समुद्र पाहिला असेल या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी आपण अनेकदा पाहिल्या असतील पण एकाच ठिकाणी तुम्ही कधी समुद्र आणि तलाव पाहिला आहे का?

6 दिवसांत 19 मिलयन पार! महिला आरक्षणापासून पक्षांतरावर कठोर कायदे… Cockroach Janata Party चे घोषणापत्र व्हायरल

व्हिडिओमध्ये एका पर्यटकाने अद्भूत दृष्य शेअर केले आहे ज्यात आपल्याला एकाच ठिकाणी खाली समुद्र आणि त्याच्यावर एक तलाव पाहता येतो. आता आपल्याला ही घटना काल्पनिक किंवा एआय जनरेटेड वाटेल पण तसं नाहीये. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे ठिकाण वास्तवात असून ते उत्तर अटलांटिक महासागरातील डेन्मार्कच्या अखत्यारीत येणाऱ्या ‘फारो द्वीपसमूह’मधील ‘वगार’ (Vagar) नावाच्या बेटावर आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओंमध्ये व्यक्ती आपल्या मुलाला पाठीवर घेऊन ठिकाणाचे साैंदर्य दाखवताना दिसला. यात खालच्या बाजूला अथांग निळाशार समुद्र वाहताना दिसतो. तर याच्या वरच्या बाजूला म्हणजेच समुद्रापासून काही अंतर वर उंचावर तलाव असून त्यातील पाणी वाहताना दिसते. आजूबाजूचे वातावरण शांत दिसते, तिथे लोकांची गर्दी अजिबात दिसत नाही. यासोबतच आकाशात काही पक्षे मुक्तपणे झेप घेत असतात. हे संपूर्णच दृष्य कोणत्या स्वप्नवत जगासारखे दिसते जिथे जाण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे.

लैंगिक अत्याचाराचा आरोपी, माजी हिंदू संघटनेचा अधिकारी तुरुंगातून सुटला… फुलांचा हार घालून केले जंगी स्वागत; Video Viral

हे ठिकाण जगातील सर्वात रहस्यमय आणि विस्मयकारक निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक मानले जाते. निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेंकर्ससाठी हे ठिकाण म्हणजे कोणत्या स्वर्गाहून कमी नाही. ठिकाणाचा व्हिडिओ व्हायरल होताच यूजर्स यातील दृष्ये पाहून थक्क झाले. काहींनी असे ठिकाण खरंच सत्यात आहे का याची खात्री करु पाहिली तरी काहींनी ठिकाणाचे लोकेशन विचारत ते नक्की कुठे वसले आहे असा प्रश्न केला. याचा व्हिडिओ @geordieramblers नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला १.६ दशलक्षाहून अधिकचे लाईक्स मिळाले आहेत तर सोशल मिडियावर व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “मला हे खूपच आवडलं!!! शिवाय, अरे हे काही AI नाहीये बरं का!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किती सुंदर आहे हे! पण अरे बाबा, त्या कड्यापासून दूर हो- मला खूप भीती वाटतेय!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला त्याच्या पाठीवरील त्याचा मुलगा फार गोड वाटला”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mysterious lake floating above atlantic ocean faroe island video gone viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • beatiful places
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.