(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
माॅलमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, मागील महिनाभरात महिलेने अनेकदा स्टोरमधून तूप आणि तेलाचे डब्बे पैसे न घेता घेऊन गेली आहे. तिच्या हालचालींवर कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळापासून संशय होता. अशात सीसीटीव्ही कॅमेरा तपासून त्यांनी महिलेच्या चोरीचा छडा लावला. यानंतर स्टाफने लगेच रंगेहात महिलेला चोरी करताना पकडले.
DLF Mall Noida: Mall employees caught a man and a woman red-handed while stealing https://t.co/BfXPHJuXmK — Ramesh Speaks (@rameshofficial0) October 5, 2026
This woman was caught red-handed stealing ghee and refined oil at DLF Mall in Noida😭💀 https://t.co/LbOx20SS76 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 5, 2026
या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये महिला आपला चेहरा लपवत माॅलच्या एका सेक्शनमधून बाहेर पडताना दिसते. यावेळी दोन महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिचा हात पकडलेला असतो. माॅलमधील कर्मचारी सांगतो की, पहिल्यांदा नाही तर चाैथ्यांदा महिलेने ही चोरी केली होती. महिलेला पकडल्यानंतर तिच्याकडून तेलाचा आणि तूपाचा डबा जप्त करण्यात आला. तसेच तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीलाही यासाठी खडसावण्यात आले. तूपाचे आणि तेलाचे पैस महिलेकडून वसूल केल्यानंतर सामंज्यस्याने हे प्रकरण मिटविण्यात आले. दरम्यान महिलेवर कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली की नाही ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






