बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं... Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अजब गजब व्हिडिओज व्हायरल होत असतात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. इथे अशा अनेक गोष्टी शेअर होतात त्यातील दृश्य पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल, असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण फटाक्यांसोबत खेळताना दिसून येतो. आता फटाक्यांसोबत खेळणे हे काही नवीन नाही पण हा तरुण एक अनोखा पराक्रम करून दाखवतो जो पाहून सर्वांनाच धक्का बसतो. व्हिडिओमध्ये तरुण चक्क जळत्या फटाक्यांना आपल्या हातावर आणि डोक्यावर फोडताना दिसून येतो आणि मुख्य म्हणजे असे करत असताना त्याला काहीही होत नाही. ज्या फटाक्यांना पाहून माणूस लांबूनच पळू लागतो अशा फटाक्यांना आपल्या अंगावर फोडताना पाहून आता युजर्स मात्र चांगलेच अवाक् झाले आहेत. व्हिडिओतील ही घटना खरंच अनन्यसाधारण असून याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर वेगाने शेअर केला जात आहे. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, या तीन तरुण फटाक्यांसोबत खेळताना दिसून येतात. सुरुवातीला दोन जण आपल्या हातात ज्वलंत फटाका फोडून दाखवतात. पण आश्चर्याची घटना तेव्हा घडते जेव्हा तिसरा व्यक्ती चक्क आपल्या डोक्यावर जळता सुतळी बॉम्ब ठेवून तो फोडताना दाखवतो. सुतळी बॉम्ब हा फटाक्यांमधील सर्वात धोकादायक फटाका मानला जातो अशात त्याला डोक्यावर फोडण जीवघेणे देखील ठरू शकते. फटाका फुटल्यानंतर तरुण आनंदाने हसताना दिसून येतो जणू काही घडलच नाही. फटाक्यांसोबत तरुणांनी केलेला हा पराक्रम आता सर्वांनाच धक्का देऊन जात आहे. व्हिडिओच्या दृश्य पाहून अवाक् झाले असून हा व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोक तरुणांना यमराजाचा मेव्हणा असल्याची उपमा देत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @_jr__fuckboys_gang_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “संपूर्ण समाज घाबरून गेला आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नासाने ९९ कॉल्स केले असतील” आणखीन एका युजरने लिहिलं आहे, “भाऊ हॅकर आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.