(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक आई चिंपांझीआपल्या बाळाला मगरीच्या जबड्यातून वाचवते. आई आपल्या मुलाला कोणत्याही संकटातून कसेही सुखरूप बाहेर काढू शकते याचे जिवंत उदाहरण या व्हिडिओतून दिसून आले. प्रसंग इतका थरारक आहे की सुरुवातीला वाटतं, आता सगळं संपलंच! पण आईचा अवतार पाहून सगळ्यांचा विश्वास बसत नाही. हातात काठी घेतलेली ती आई जणू जंगलातली खरी सुपरहिरोच ठरते.
कथा अगदी सरळ आहे पण अंगावर काटा आणणारी. जंगलात दबा धरून बसलेल्या मगराने अचानक चिंपान्झीच्या पिल्लावर झडप घातली. बिचारं पिल्लू त्याच्या जबड्यात अडकलं. दूर उभी असलेली आई धावत आली, वाटेत पडलेली काठी उचलली आणि जणू चित्रपटातील हिरोप्रमाणे मगराकडे झेपावली. पिल्लू रडत होतं, मगर खुशीत होता, पण आईच्या एका जोरदार वाराने खेळच पलटला. मगराचे तोंड उघडलं आणि पिल्लू सुरक्षित बाहेर निसटलं. हा क्षण बघून अंगावर रोमांच उभे राहतात.
खरं मनोरंजन तर पुढच्या सीनमध्ये आहे. आईच्या काठीचा धक्का बसताच मगराने डोकं वर करून किंकाळी फोडली. पूर्ण शरीर वाकडं-तिकडं ऐंठलं, चेहऱ्यावर असा भाव आला की जणू एखाद्या कॉमेडी कॅरेक्टरने अभिनय केलाय. पिल्लू मात्र आईच्या जवळ सुरक्षित होतं. व्हिडिओच्या पहिल्या भागात प्रेक्षकांची धडधड वाढली होती, पण पुढच्याच क्षणी सगळे पोट धरून हसू लागले.
pic.twitter.com/mQUfgvRGRB — Mecha Enjoyer 🤖❤️🔥 (@rd_mech) September 30, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @rd_mech नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे एआय आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आईची ताकद म्हणजे खरी सुपरपॉवर” आणखीन एका युजरने लिहिलं आहे, “मगरीला चांगली अद्दल घडली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.