Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवतेय! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवर बोलावलं, अश्रूंनी भरले पत्नीचे डोळे; Video Viral

Operation Sindoor: आधी लगीन कोंढाण्याचं! जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील याचे नुकतेच लग्न पार पडले आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याला ड्युटीवर बोलवण्यात आले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2025 | 02:27 PM
ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवतेय! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवर बोलावलं, अश्रूंनी भरले पत्नीचे डोळे; Video Viral

ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवतेय! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवर बोलावलं, अश्रूंनी भरले पत्नीचे डोळे; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

पहलगाम हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. या हल्लयाअंतर्गत पाकिस्तानमधील तब्बल ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. अजूनही दोन्ही देशांमध्ये युद्धाचे वातावरण असून हा मुद्दा आता जगभर एक चर्चेचा विषय बनला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केल्यानंतर याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले गेले. यातील बरेच व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल देखील झाले. त्यातच आता यासंबंधित आणखीन एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून आला. मात्र यात हल्ल्याचे दृश्य नसून काही भावनिक दृश्ये दाखवण्यात आली जी पाहून सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आले.

ताईंनी Operation Sindoor जास्तच मनावर घेतलंय, अख्ख डोकं सिंदुराने भरलं अन् दृश्य पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात; Video Viral

देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने जवानांना त्वरित बोलवण्यात येत आहे. अशातच यात सुट्टीवर असलेल्या मनोज पाटीललाही सीमेवर बोलावण्यात आले. विशेष म्हणजे, मनोजचे नुकतेच लग्न झाले असून लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याला देशसेवेसाठी तात्काळ ड्युटीवर बोलवण्यात आले. अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह मनोजची पत्नी त्याला निरोप द्यायला रेल्वे स्थानकावर पोहचली.

यावेळी मनोजचे संपूर्ण कुटूंब तेथे उपस्थित होते. व्हिडिओमध्ये तुम्ही कुटुंबाचे निराशाजनक चेहरे पाहू शकता. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि आपल्या पतीच्या येण्याची आस मनात ठेवत पत्नी यामिनी हिने मनोजला निरोप दिला. निरोपाचा हा दुःखद व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे. देशसेवेसाठी मनोजने ओल्या हळदीने पोस्टींवर रवाना होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या हे धाडसी पाऊल पाहून अनेकजण आता मनोजचे कौतुक करत आहेत तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूवर अशी वेळ आल्याने लोक भावुक होऊन खंत देखील व्यक्त करत आहेत.

सगळ काही भारत मातेसाठी…
लग्नाच्या तीन दिवसांनंतर महाराष्ट्राचे सुपूत्र मनोज पाटील देश सेवेसाठी रवाना… #oprationsindoor #IndianNavyAction #IndiaPakistanTensions #jalgaonnews #India #army #manojpatil #देशसेवा pic.twitter.com/1gmbhYcoTD
— Ganesh Pokale… (@P_Ganesh_07) May 9, 2025

Trump Viral Video: हातात पाण्याची बाटली अन् पाणी-पाणी करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली

दरम्यान ५ मे रोजी मनोज आणि यामिनचा विवाहसोहळा पार पडला होता. लग्नाचे दोन दिवस उलटत नाही तितक्यात मनोजला ऑन ड्युटी हजर राहण्यासाठी बोलावणे आले. यानंतर लग्नाचे सर्व कार्यक्रम रद्द करून मनोज आपल्या ड्युटीवर परतला.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Operation sindoor the soldier was called to the border on the very next day of the wedding heartfelt video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • indian Soldiers
  • Operation Sindoor
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”
1

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
2

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral
3

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…
4

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.