(फोटो सौजन्य: Instagram)
भारत-पाकिस्तान युद्धाचे आता स्थगिती घेतली असली तरी याचे परिणाम दोन्ही देशांमध्ये तितक्याच तीव्रतेने आणि मोठ्या स्वरूपात होताना दिसून येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ल्याची रणनीती आखली आणि यात यशस्वी देखील झाले, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही देशांनी एकमेकांवर अनेक हल्ले केले. यातच भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी पाणी करार रद्द करण्याचाही ऐतिहासिक निर्णय घेतला. पाकिस्तानसोबतच्या तीन युद्धांनंतरही भारताने हा करार कायम ठेवल्यामुळे सरकारचे हे पाऊल फार महत्त्वाचे मानले जाऊ लागले. निश्चितच याचा पाकिस्तानवर मोठा परिणाम घडत असून यासंबंधितच एक पाकिस्तानमधून एक भयाण व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो सर्वांचे होश उडवत आहे.
सिंधू नदीचा प्रवास बंद केल्यानंतर पाकिस्तानला पाण्याची कमतरता भासणार हे नक्कीच होते मात्र पाण्याची इतकी कमतरता होईल याचा कोणी विचारही केला नसेल. वास्तविक, नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाणी नसल्याचे पाकिस्तानी लोक वाळूने आंघोळ करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, गुरखा घातलेल्या काही महिला रडत रडत आपल्या अंगावर वाळू फेकत असल्याचे दिसून आले. तसेच हे सर्व दृश्य एक व्यक्ती आपल्या कॅमेरात कैद करत असल्याचे व्हिडिओत दिसून आले.
पाकिस्तानला पाणी नाही मिळाले तर वाळूने आंघोळ करू लागले असे व्हिडिओमध्ये लिहिण्यात आले आहे. हा व्हिडिओ @sukumarbhardwaj52 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून इंटरनेटवर आता हा व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. हजारो युजर्सने व्हिडिओच्या कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा इराकच्या करबला येथील शोकाचा व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांना भुताने पछाडले तर नाही?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.