
'मित्र' समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष...घटनेचा Video Viral
१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काळजीवाहक नेहमीप्रमाणे मगरीजवळ जाऊन तिला चिकन खायला देण्याचे काम करत होता. याच वेळी विशालकाय मगरीने चिकनला सोडून काळजीवाहकालाच आपले अन्न बनवण्याचा विचार केला आणि त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. मगरीने त्याचे पाय ओढले आणि त्याला पाण्यात खेचून अक्षरश: खेचून घेतले. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात असहाय्य झालेला काळजीवाहक स्वतःला वाचवण्यासाठी तलावाच्या काठाला घट्ट धरून असल्याचे दिसत आहे. त्याचे दोन्ही पाय मगरीच्या तोंडात होते. पार्कचे सुरक्षा रक्षक आणि जवळपासच्या लोकांनाही यात फारशी मदत करता आली नाही. त्यांनी लोखंडी काठीने मगरीचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला त्याचा काहीच उपयोग झाला नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, घटनेवेळी काळजीवाहकाच्या मुखातून फक्त एकच वाक्य बाहेर पडले ते म्हणजे, “मी काहीही चुकीचे केले नाही.”
Papua New Guinea 🇵🇬:A Crocodile 🐊keeper at the Adventure Park in Port Moresby, 14 Mile, was attacked by his own crocodile.Police 👮shot the crocodile dead and saved the man, although both of his legs were bitten off by the crocodile. pic.twitter.com/arYA3MnJfl — marknehpets (@mapkpets) September 5, 2026
दुसरीकडे घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू टीम काही वेळाने सेंट जॉन एम्बुलंस आणि स्थानिक पोलिस पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाली. पार्कमध्ये उपस्थित पर्यटकांना लगोलग पार्कमध्ये बाहेर काढण्यात आलं. जेव्हा अनेक प्रयत्न केल्यानंतरही मगर काळजीवाहकाला सोडायला तयार नव्हती तेव्हा पोलिस पथकाने गोळी झाडत मगरीला मारुन टाकणे योग्य ठरवले. मगरीचा मृत्यू झाल्यानंतर काळजीवाहकाला तिच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. हल्ल्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याला ‘3 माइल जनरल हाॅस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले आहे जिथे डाॅक्टर त्याच्यावर योग्य ते उपचार करत आहेत. सोशल मिडियावर या घटनेचे फुटेज आता चांगलेच व्हायरल होत असून सुरक्षा प्रोटोकॉल संबंधित वेगवेगळ्या प्रतिक्रिया इंटरनेटवर व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @mapkpets नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.