(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या लहान क्लिपमध्ये रस्त्याच्या कडेला एक ‘डेअरी’ ट्रक उभा दिसतो. या ट्रकल्या मागच्या बाजूला दूधाच्या डेअरीची ब्रँडिंग केलेली असते ज्यासाठी येथे एक पोस्टर लावण्यात आलेले असते. या पोस्टरवर आपल्यााला कंपनीचे नाव दूधाच्या बाटल्या आणि एक पांढरी शुभ्र गाय दिसून येते. अशात गाडीच्या बाजूनेच एक लहान वासरु जात असते. वासराचे लक्ष जेव्हा गाडीच्या पोस्टरवरील गायीवर जाते तेव्हा गाईला आपली आई समजून वासरु त्या गाईजवळ जाऊ लागते.
खरंतर वासरु भूकने व्याकूळ झालेले असते, त्याला गरज असते ती दूधाच्या काही थेंबांची. अशात पोस्टरवरील गाईला पाहताच तो कोणताही विचार न करता गाडीजवळ जातो आणि आपले पाय उंचावत पोस्टरवरील गायीचे दूध पिण्याचा प्रयत्न करु लागतो. बराच वेळ पोस्टरला स्पर्श केल्यानंतरही जेव्हा त्यातून दूधाच्या धारा येत नाहीत तेव्हा वासरु आश्चर्यचकित होते आणि गाडीपासून दूर जाऊन याकडे एकटक पाहत राहते. रस्त्याने जाणाऱ्या एका वाटसरुने हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ @reuo_was152 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “बिचाऱ्याला वाटलं असेल की त्याला खूप सारं दूध पिता येईल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो खूप भूकेला दिसत आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “व्हिडिओ काढण्याऐवजी त्याला दूध पाजायला हवे होते”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






